Swarup Nayak: प्रसिद्ध संगीतकार-गीतकार स्वरूप नायक यांची कॅन्सरशी झुंज अयशस्वी, 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Odia Music Director: स्वरूप नायक यांना गेल्या काही महिन्यापासून कॅन्सरने ग्रासले होते.
Swarup Nayak Died
Swarup Nayak Died Saam TV
Published On

Music Director And Lyricist Passes Away:

ओडिशातील सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गीतकर स्वरूप नायक यांचे निधन झाले आहे. स्वरूप नायक ७६ वर्षांचे होते. काटक येथी त्याच्या निवास्थानी थांचे निधन झाले आहे. स्वरूप नायक यांना गेल्या काही महिन्यापासून कॅन्सरने ग्रासले होते. स्वरूप नायक यांना घशाचा कॅन्सर झाला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्वरूप नायक यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४६ साली झाला होता. १९६२ झाली 'लक्ष्मी' ओडिया चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९६५ साली आलेला 'का' आणि १९६८ आलेल्या 'स्त्री' या चित्रपटामध्ये देखील त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. त्यांनतर त्यांनी अभिनयातून ब्रेक घेतला.

१९७७ साली 'सुना संसार' या चित्रपटातून त्यांनी पुन्हा त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. २००८ साली प्रदर्शित झालेला 'कलिंगपुत्र' हा अभिनेता म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

हीरा नीला, बगुला बगुली, लाल पान बीबी, जहाकु राखीबे अनंता आणि की हेबा सुआ पोसिले'सह ४१ ओडिया चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच त्यात ३० चित्रपटाचे गीतलेखन देखील केले आहे.

Swarup Nayak Died
HBD Shivani Rangole: ऑनस्क्रीन सासूची सूनेसाठी वाढदिवशी खास पोस्ट; 'तुझ्याशी वाईट वागले तरी...' म्हणत भुवनेश्वरीने अक्षराला दिल्या शुभेच्छा

एक्सवर पोस्ट करत ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्वरूप नायक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'प्रख्यात संगीतकार आणि गीतकार स्वरूप नायक यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांच्या मनात विशिष्ट स्थान नेहमीच असेल.

नायक त्यांच्या ओडिया चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी कायम स्मरणात राहतील. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.' असे ट्विट नवीन पटनायक यांनी केले आहे. तसेच त्यांनी घोषणा केली की स्वरूप नायक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com