Shah Rukh Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan : किंग खानने केली 'गे' ची भूमिका, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

SRK Play Gay Role : बॉलिवूडच्या किंग खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान 'गे' च्या भूमिकेत दिसत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडच्या किंग खानचे जगभरात करोडो चाहते आहेत. आजवर सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांनी आपल्या स्टाईल आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. किंग खानने अनेक सुपर हिट चित्रपट दिले आहे. तो कोणत्याही भूमिकेत जीव ओततो. त्याचे चित्रपट पाहायला थिएटर बाहेर रांगा लागतात. शाहरुख खानच्या पठाण आणि जवान चित्रपटाने बंपर कमाई केली असून अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

किंग खानने 'दीवार' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या आधीही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकाही साकारल्या होत्या. पण 'दीवार'या चित्रपटातून तो प्रमुख भूमिकेत दिसला. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही शाहरुख खानला (SRK) एका वेगळ्या भूमिकेत पाहत आहात.

सध्या सोशल मीडियावरवर 'In Which Annie Gives It Those Ones' या चित्रपटाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या चित्रपटात किंग खानने 'गे' ची भूमिका साकरली आहे. या चित्रपटात शाहरुख खान कॉलेज विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारने गौरवण्यात देखील आले आहे. या चित्रपटाची लेखिका अरुंधती रॉय आहे. तर त्यांच्या नवऱ्याने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अनेक आताच्या मोठ्या कलाकारांनी काम केले आहे. ही आव्हानात्मक भूमिका किंगने खूप छान पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडली. 90च्या दशकात समलैंगिक विषयांवर चित्रपट काढणे आणि त्यात प्रमुख गे ची भूमिका करणे हे खरंच मोठ काम आहे.

चित्रपटांआधी किंग खानने 'फौजी' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. यानंतर त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. यात दिल दरिया, इडियट, वागले की दुनिया, उम्मीद अशा अनेक मालिकांचा यात समावेश आहे. 'सर्कस' या मालिकेमुळे शाहरुख खानला प्रसिद्धी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

SCROLL FOR NEXT