kiara advani Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

kiara advani: 'मी तुझं डायपर बदलते, तू माझं...'; कियारा अडवाणीने लाडक्या लेकीसाठी शेअर केली क्यूट पोस्ट

kiara advani Post: बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना १५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये गोड अशी मुलगी झाली. आता कियाराने तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Shruti Vilas Kadam

kiara advani Post: बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना १५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये गोड अशी मुलगी झाली. त्यांच्या आयुष्यातील हा अद्भुत आणि आनंददायी क्षण त्यांनी सोशल मिडियावर एक गुलाबी पोस्टरच्या माध्यमातून जाहीर केला, ज्यावर लिहिले होते, "आमचे मन भरून आले आहे आणि आमचे जग कायमचे बदलले आहे. आमच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे."

अलीकडेच, कियारा अडवाणीने तिच्या मुलीसोबत अनुभवलेल्या क्षणांचे एक अतिशय हृदयस्पर्शी आणि भावनिक पोस्ट द्वारे वर्णन केलं आहे. तिने रात्री उशिरा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "मी तुझं डायपर बदलते, तू माझं जग बदल" या साध्या पण भावपूर्ण ओळींनी नवीन मातृत्वाच्या प्रेम, थकवा आणि गोड क्षणांचं मिश्रण मांडलं आहे. ही इंस्टा पोस्ट सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

याशिवाय, कियाराचा ३१ जुलै रोजी वाढदिवस साजरा झाला आई म्हणून तिचा पहिला वाढदिवस होता. या खास दिवशी तिने "Wonderful Mama" असं लिहिलेला केक शेअर केला आणि लिहिले,"माझा सर्वात खास वाढदिवस माझ्या आयुष्यातील प्रेमाने भरलेला... माझे बाळ, माझा नवरा आणि माझे आई-वडील... अविश्वसनीय कृतज्ञ धन्य."

कियाराच्या कामाबद्दल बोलयचे झाले तर, लवकरच ती 'वॉर 2' या बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे, या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Pune Accident: खेडमधील पिकअप अपघातातील ९ मृतांची नावं आली समोर, पापळवाडी गावावर शोककळा

Asia Cup 2025 India Squad: श्रेयस अय्यर पास; हार्दिक पांड्या वेटिंगवर तर सूर्या दादाबाबत सस्पेन्स

Janhvi Kapoor: परम सुंदरीचा नविन फ्लॉरल साडी लूक पाहिलात का?

बनावट शाळा आयडी प्रकरणात कारवाईचा धडाका; हजारो लाडक्या शिक्षक रडारवर|VIDEO

Maharashtra Live News Update: मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी केवळ ऑनलाइनच नोंदणी

SCROLL FOR NEXT