केजीएफ फेम अभिनेता हरीश राय यांचे निधन
वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला
गेल्या अनेक वर्षांपासून ते गळ्याच्या कॅन्सरशी झुंज देत होते
त्यांची कॅन्सरसोबतची झुंज गुरुवारी अखेरची ठरली
कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले. केजीएफ फेम अभिनेते हरीश राय यांचे आज निधन झाले. ६६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना थायरॉईडचा कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर बंगळुरू येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची कॅसरसोबतची झुंज अपयशी ठरली. केजीएफ चित्रपटात त्यांनी रॉकीभाईच्या काकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनामुळे फिल्म इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत सिनेकलाकार आणि त्यांचे चाहते श्रद्धांजली देत आहेत.
हरीश राय यांना थायरॉईड कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कॅन्सर त्यांच्या पोटापर्यंत पसरला होता आणि त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरूवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट करत अभिनेत्याला श्रद्धांजली दिली. त्यांच्या निधनामुळे फक्त कन्नड चित्रपटसृष्टीला नाही तर संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीला धक्का बसला.
हरीश राय यांनी ३ दशकं सिनेसृष्टीत काम केले. त्यांनी कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. आपल्या दमदार भूमकांसाठी ते ओळखले जात होते. त्यांनी १९९० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट 'ओम'मध्ये डॉन रॉयची भूमिका केली होती. या भूमिकेमुळे त्यांना घराघरात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी तमिळ आणि कन्नड अशा अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका करून स्वतःची ओळख निर्माण केली होती. खलनायकाची भूमिका असो किंवा भावनिक पिता-पुत्राची भूमिका अशा सगळ्या भूमिका साकारत ते प्रेक्षकांचे मन जिंकत होते.
केजीएफ चित्रपटात त्यांनी सुपरस्टार यशच्या चाचाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. दरम्यान, त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक प्रमुख अभिनेते, दिग्दर्शक आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर भावनिक संदेश लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. हरीश राय यांनी फक्त कन्नड चित्रपटांमध्येच नाही तर तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले. त्यांच्या प्रत्येक भूमिका कायम सर्वांच्या लक्षात राहण्यासारख्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.