Actor Prarthana Behere Dad Death : “बाबा काळजी करू नका, मी खूप…”, मराठी अभिनेत्रीला पितृशोक!

Prarthana Behere Dad Death : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं अपघाती निधन झालं आहे. वडिलांच्या अकाली जाण्याने अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर तिने वडिलांसाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
Actor Prarthana Behere Dad Death : “बाबा काळजी करू नका, मी खूप…”, मराठी अभिनेत्रीला पितृशोक!
Entertainment NewsSaam Tv
Published On
Summary

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं रस्ते अपघातात निधन

अभिनेत्रीने सोशल मीडियावर वडिलांसाठी भावनिक पोस्ट शेअर केली

अनेक मराठी कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली

काही दिवसांपूर्वीच तिच्या जवळची मैत्रीण प्रिया मराठेचं निधन

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रार्थनाच्या वडिलांचं अपघाती निधन झालं आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर वडिलांच्या निधनाबद्दल पोस्ट करून माहिती दिली आहे. तिने वडिलांसाठी एक भावुक पोस्ट केली आहे. तुमच्या अचानक जाण्याने आम्ही सगळेच खुप दुखावलो आहोत, असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या रस्ते अपघातात प्रार्थनाच्या वडिलांचं निधन झालं. काही दिवसांपूर्वी प्रार्थनाची जवळची मैत्रीण प्रिया मराठे हिचं कॅन्सरमुळे निधन झालं. यानंतर तिने वडिलांना गमावलं आहे. वडिलांच्या अशा अकाली जाण्याने अभिनेत्रीला दुःख अनावर झाले आहे. प्रार्थनाने सोशल मीडियावर भावुक पोस्ट केली आहे.

Actor Prarthana Behere Dad Death : “बाबा काळजी करू नका, मी खूप…”, मराठी अभिनेत्रीला पितृशोक!
Shocking News : लखपती भिकारी महिलेची भुवया उंचावणारी श्रीमंती! कचऱ्यात सापडले लाखो रुपये

काय म्हणाली अभिनेत्री?

या पोस्टमध्ये प्रार्थनाने म्हटलं आहे की,

"मर के भी किसी को याद आएंगे

किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे

कहेगा फूल हर कली से बार बार

जीना इसी का नाम है “

माझे बाबा .... ❤️

१४ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन दुर्दैवाने एका road अपघातात झाले”

बाबा ....... तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय , तुमचं हास्य अजूनही आमच्या कानात गुंजतं, तुमचा आत्मविश्वास आमच्या मनाला बळ देतो, आणि तुमचं जीवन पाहून आम्हाला शिकायला मिळालं की आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे, तर दृष्टिकोन असतो. तुमचा प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि लोकांप्रती असलेलं निस्सीम प्रेम आम्हाला माणुसकीचं खरं मूल्य शिकवून गेलं. तुम्ही आम्हाला शिकवलंत की इतरांना मदत करणे हेच खरं समाधान आहे. आज तुम्ही आमच्यासोबत नसला तरी तुमचा आवाज आणि गाणी आम्हाला सतत बळ देतात. तुमची अचानक झालेली exit, मनाला भयंकर लागली आहे. काल परवा पर्यंत सगळ अलबेल होतं. तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खुप दुखावलो आहोत. प्रत्येक क्षणी तुमची आठवण येतच रहाणार आहे. पण या सगळ्या घटनेला वेगळ्या दृष्टीने पाहीलं तर, तुम्ही अधिक प्रत्येकाच्या जवळ रहाणार आहात. कारण तुम्ही स्मरणात रहाणार. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी, आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा, तुमच्याशी संवाद साधू शकतोय. तुम्हाला आजपर्यंत अभिमान वाटेल अशीच कामगिरी मी करत आली आहे. आता अधिक जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्हाला माझ्या अप्रतिम कामाने श्रध्दांजली अर्पण करत रहाणं, हे माझं कर्तव्य आहे. डोळ्यातलं पाणी कधीच तुम्हाला दिसू नये याची काळजी घेईन. कारण मलाही तुम्हाला धूसर पहायचं नाही. तुमचं ओठावरचं हसू, मनात घर करून राहीलं आहे. तेच टिकवण्याची जबाबदारी मी घेणार आहे. काळजी करू नका... मी खुप strong आहे. कारण माझ्या पाठीशी नाही तर, तुम्ही सोबत आहात याची खात्री आहे. I LOVE YOU BABA , MISS YOU FOREVER, तुमची Tumpa❤️

दरम्यान अलीकडेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचा ७५ वा वाढदिवस पार पडला. मात्र प्रार्थनाची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेक दिग्गज कलाकारांनी कमेंटमध्ये धीर दिला आहे. केदार शिंदे, मयुरी देशमुख, सुबोध भावे, अमृता खानविलकर, वैभव तत्ववादी, पुष्कर जोग प्रार्थनाच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com