
प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर सिंग घुमान यांचं निधन झालं आहे.
फोर्टिस रुग्णालयात किरकोळ शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यांनी सलमान खानसोबत हिंदी चित्रपटात काम केलं होतं.
पंजाबी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेता आणि बॉडीबिल्डर वरिंदर सिंग घुमान यांचे निधन झाले आहे. निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. बॉडीबिल्डर वरिंदर सिंग घुमान यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. वरिंदर अमृतसरमधील फोर्टिस रुग्णालयात एका किरकोळ शस्त्रक्रियेसाठी गेला होता. त्यावेळी तो एकटाच होता. ऑपरेशन छोटे असल्यानं घरून त्यांच्यासोबत कोणी गेलं नाही. मात्र ऑपरेशनच्यावेळीच त्याला कार्डियक अरेस्टचा झटका आला, त्याचा मृत्यू झाला.
"टायगर ३" चित्रपटात वरिंदर सलमान खानसोबत दिसला होता. त्याच्या बॉडीबिल्डिंग कौशल्याचे सर्वांनी कौतुक केले होते. वरिंदरच्या शरीरयष्टी पाहून सलमान खान सुद्धा मंत्रमुग्ध झाले होता. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. वरिंदरने सोशल मीडियावर सलमान खानसोबतचा एक फोटोही शेअर केला होता. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा वरिंदर त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे चाहत्यांमध्ये हिट झाला होता. वरिंदर हा एक सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर होता.
त्याने २००९ मध्ये मिस्टर इंडियाचा किताब जिंकला होता. मिस्टर एशिया चॅम्पियनशिपमध्येही तो दुसऱ्या क्रमांकाचा विजेता होता. त्याला "द ही-मॅन ऑफ इंडिया" म्हणून ओळखले जात असे. वरिंदरला अभिनयाचीही आवड होती. वरिंदरला फिटनेससह अभिनयातही रस होता. तो अनेक पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्यापैकी "कबड्डी वन्स अपॉन" हा एक पंजाबी चित्रपटामुळे तो एका रात्रीत स्टार बनवला होता. वरिंदरने या चित्रपटाद्वारेच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. वरिंदरने "रोअर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स" या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तो "मरजावां" मध्ये दिसला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.