Famous Influencer Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Influencer Death : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची आत्महत्या, भाड्याच्या घरात आढळला मृतदेह

Famous Social Media Influencer Passed Away : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आत्महत्या केली आहे. वयाच्या 24 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आत्महत्या केली आहे.

इन्फ्लुएंसरचा मृतदेह तिच्या भाड्याच्या घरी आढळला.

सोशल मीडियाच्या जगातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर चिन्नू पप्पू हिचे 9 फेब्रुवारी रोजी निधन झाले. 24 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. तिचा मृतदेह भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये सापडला. घरात तिचा मृतदेह फाशीला लटकलेला आढळला. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तपासणीनंतर डॉक्टरांनी चिन्नू पप्पूला मृत घोषित केले.

चिन्नू ही कासारगोडमधील अडूरची रहिवासी होती. प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार आत्महत्या असल्याचे बोले जात आहे. ही घटना दुपारी घडली. चिन्नू पप्पूचे खरे नाव रेश्मा असे होते. तिला सोशल मीडियावर चिन्नू पप्पू म्हणून ओळखले जात होते. ती भाड्याच्या घरात राहत होती. तिचा मृतदेह अपार्टमेंटच्या एका खोलीत फाशीला लटकलेला आढळला. चिन्नू ही गंगाधरन आणि शैलजा यांची मुलगी होती. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. तिचा मोठा चाहता वर्ग होता.

रेश्मा तिच्या मातृभाषेत व्हिडीओ बनवून लोकप्रिय झाली होती. तिचे व्हिडीओ खूप व्हायरल देखील झाले आहेत. ती फूड ब्लॉगिंग देखील करायची. त्यामुळे तिच्या अशा अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार असे बोले जाते की, तिचे लग्न झाले होते. परंतु सुमारे एक महिन्यापूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. तिचे चार वर्षांचे मुल सध्या अदूर येथे रेश्माच्या पालकांसोबत राहत आहे. मात्र कोणतीही अधिकृत माहिती नाही.

घटनेनंतर, शेजाऱ्यांनी ताबडतोब रेश्माला वाचवण्यासाठी जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दुपारी 2 वाजताच्या सुमारास पोलिसांनी तिच्या पालकांना ही दुःखद बातमी कळवली. पोलीस आता या घटनेचा तपास घेत आहे. तिच्या घटस्फोटाचा याच्याशी संबंध लावला जात आहे. तिच्या अचानक मृत्यूमुळे त्याचे कुटुंब आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT