Kaun Banega Crorepati  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kaun Banega Crorepati 15: KBC मध्ये १ कोटी जिंकणारा मयंक आहे तरी कोण?, आज देणार ७ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर

Kaun Banega Crorepati New Promo: मयंक हरियाणातील (Haryana) महेंद्रगडमधील पाली गावामध्ये राहतो. मयंक 13 वर्षांचा असून तो आठवीत शिकतो.

Priya More

Kaun Banega Crorepati New Episode:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'कौन बनेगा करोडपती 15'मध्ये (Kaun Banega Crorepati 15) आलेल्या एका 13 वर्षांच्या मुलाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. हॉट सीटवर बसलेल्या या मुलाने आतापर्यंत एक कोटी रुपये जिंकले आहेत. या मुलाचे नाव आहे मयंक. मयंकने एक कोटी रुपये जिंकून इतिहास रचला आहे. मयंक (Mayank) आज ७ कोटींच्या प्रश्नावर उत्तर देणार आहे. हा मयंक आहे तरी कोण? हे आज आपण जाणून घेणार आहोत...

मयंक सध्या या शोच्या हॉट सीटवर बसून बिग बींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. मयंक हरियाणातील (Haryana) महेंद्रगडमधील पाली गावामध्ये राहतो. मयंक 13 वर्षांचा असून तो आठवीत शिकतो. मयंकचे वडील दिल्ली पोलिसात हेड कॉन्स्टेबल आहेत. मयंकच्या हुशारीचे सध्या सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.

'कौन बनेगा करोडपती' या शोशी संबंधित एक प्रोमोही व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मयंकचे नॉलेज पाहून अमिताभ बच्चन देखील आश्चर्यचकीत झाले आहेत. 'ज्ञान हीच गोष्ट महत्त्वाची आहे', असे मयंकचे मत आहे. मयंककडे बघून अमिताभ म्हणतात, 'कुठे वाचतोस हे सगळं.' मयंकच्या आई-वडिलांना बिग बी विचारतात की, 'त्याला एवढे ज्ञान कुठून मिळाले.' तर मयंकचे वडील म्हणतात, 'सर, त्याचे शिक्षकही चिंतेत आहेत. दोन दिवसांनी काय शिकवले जाईल हे तो आधीच विचारतो.'

'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये मयांक 7 कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहचला आहे. मयंक त्याच्या नॉलेजच्या माध्यमातून 7 कोटी रुपयांची रक्कम जिंकू शकतो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता प्रेक्षकांना मयंकचा हा एपिसोड पाहण्याची उत्सुकता लागली आहे. फक्त अमिताभ बच्चनच नाही तर सर्वस्तरावरून त्याचे कौतुक केले जात आहे.

दरम्यान, मयंकने 1 कोटी रुपये जिंकल्याच्या आनंदात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मयंकच्या कुटुंबीयांना फोन करून शुभेच्छा दिल्या. त्याचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्र्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'हरियाणातील महेंद्रगड येथील 8 वी चा हुशार विद्यार्थी असलेल्या मयंकने आपल्या ज्ञान आणि कौशल्याने केबीसी ज्युनियरमध्ये 1 कोटी रुपये जिंकून राज्याचे नाव उंचावलं आहे. टॅलेंटेड मुलाच्या वडिलांशी फोनवर बोलून त्यांचे अभिनंदन केले आणि मयंकला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT