Haryana Nuh clashes
Haryana Nuh clashesSAAM TV

Haryana Nuh clashes : हरियाणा हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये; ४१ एफआयआर, ११६ अटकेत, SIT चौकशी

Delhi On High Alert : गुरुग्राममधील घटनेनंतर राजधानी दिल्लीतही हायअलर्ट जारी केला.
Published on

Haryana Nuh Clashes Updates : हरियाणाच्या नूंहमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दिल्लीला लागूनच असलेल्या गुरुग्राममध्येही जोरदार राडा झाला. त्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. तेथील नागरिक परिसर सोडून जात असल्याचे वृत्त होते. आता पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. परिस्थिती निवळत आहे. कुणीही घरे सोडून जाऊ नका, असं आवाहन करण्यात येत आहे. कोणतीही परिस्थिती उद्भवली तर ११२ या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन गुरुग्रामचे पोलीस अधिकारी वरूण कुमार यांनी केले आहे.

हरियाणाचे डीजीपी पी. के. अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. आतापर्यंत ४१ एफआयआर दाखल करण्यात आले असून, ११६ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केले जाणार आहे. हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी निमलष्करी दलाच्या २० तुकड्या मदतीला होत्या. त्यातील तीन पलवल, एक फरिदाबाद, १ गुरुग्राम आणि उर्वरित १४ या नूंहमध्ये तैनात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Haryana Nuh clashes
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि हरियाणा सरकारला फटकारले

डीजीपींनी सांगितलं की, या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ज्या भागांत संचारबंदी घोषित करण्यात आली होती, तिथे थोडी शिथिलता देण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यास मुभा दिली जात आहे.

गुरुग्रामची परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरातील सर्व मॉल, स्कूल, कॉलेज, मेट्रो आदी सर्व सुविधा सुरू आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. हिंसाचाराच्या घटनेनंतर अनेकांनी घरे सोडल्याचे वृत्त होते. त्यावर कुणीही घरे सोडू नका. सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत, त्याकडे दुर्लक्ष करा, असे आवाहनही त्यांनी केले. (Latest Marathi News)

Haryana Nuh clashes
Haryana Nuh Clashes: हरियाणात दोन गटाचा वाद पेटला; ५ ठिकाणांचं इंटरनेट बंद, काही जिल्ह्यात १४४ लागू

दिल्ली अलर्टवर

नूंह येथील घटनेनंतर आजूबाजूच्या राज्यांत त्याचे पडसाद उमटत आहेत. दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राम आणि राजस्थानमध्ये काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. गुरुग्राममधील घटनेनंतर राजधानी दिल्लीतही हायअलर्ट जारी केला आहे. गुरुग्राम-दिल्ली सीमेवर मोठ्या संख्येने पोलीस तैनात केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com