Haryana Nuh Clashes: हरियाणात दोन गटाचा वाद पेटला; ५ ठिकाणांचं इंटरनेट बंद, काही जिल्ह्यात १४४ लागू

Haryana Nuh Clashes: हिंसेवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Haryana Nuh Clashes
Haryana Nuh ClashesSaam tv
Published On

Haryana Nuh News: हरियाणातील मेवात-नूंह येथे सोमवारी धार्मिक यात्रेवरून दोन गटात वादाची ठिणगी पडली. या दोन गटाच्या वादानंतर शहरातील काही भागात हिंसा भडकली. या घटनेत दोन होमगार्डसहित चार जणांचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आहेत. हिंसेवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नूहसह हरयाणाच्या काही जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

हरियाणातील नूह येथे काल हिंसा भडकल्यानंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. आजही काही गटातील लोकांनी वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला. हिंसेनंतर हरियाणातील इंटरनेट बंद करण्यात आलं. नूह,पलवल, पटौदी, सोहाना,मानेसर या भागात इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

Haryana Nuh Clashes
Bihar Crime News: ६ इंच जमिनीसाठी BSAP जवानाची हत्या; पोलिसांना कॉल करूनही नाही आले, परिसरात पसरली दहशत

हरियाणात नेमकं काय झालं?

हरियाणातील नूंह येथे विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या वतीने ब्रजमंडल यात्रा काढण्यात आली. यात्रेवर दगडफेक करण्यात झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच हिंसा भडकली. या हिंसेत 40 वाहने हिंसक जमावाने जाळली, असं सांगण्यात येत आहे.

विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी सांगितले की, ब्रजमंडल शोभायात्रेवर काही जणांनी दगडफेक केली. यात्रेसाठी २० ते २५ हजार लोक होते. पंधरा मिनिटांच्या आतच शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. पेट्रोल बॉम्ब देखील फेकण्यात आले. यावेळी वाहनांना आग लावण्याच्या देखील घटना घडल्या. गोळीबार देखील झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Haryana Nuh Clashes
Delhi Services Bill: केंद्र सरकारकडून लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर; विरोधकांचा गदारोळ

दरम्यान, गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू झाला. पोलीस येताच हल्लेखोरांनी पळ काढला. यावेळी एका युवकाचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. पोलीस प्रशासनाने आता परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. या घटनेवरून राजकारण पेटू लागलं आहे. या घटनेवरून आरोप-प्रत्यारोपही होऊ लागले आहेत. हल्लेखोरांनी गुरुग्राम-अलवर महामार्ग आणि अनाज मंडी परिसरातही गोंधळ घातला. तसेच धार्मिक स्थळांचीही तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com