Karmaveer Bhaurao Patil Biopic Poster
मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट सध्या रिलीज होताना दिसत आहे. लवकरच आद्य सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या जीवनपट येत्या १७ मेला रिलीज होणार आहे. (Marathi Film)
कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि घटना यांचा समावेश चित्रपटात करण्यात आला आहे. या जीवनपटामध्ये, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची भूमिका अभिनेते किशोर कदम यांनी केली आहे. भाऊराव पाटील यांच्यावर महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव पडलेला होता. त्यांच्याच विचारांना अनुसरून भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. (Marathi Actors)
पूर्वी अनेक गोरगरिबांची आणि ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. इतरांप्रमाणे त्यांनाही समान हक्क मिळावा, असा भाऊराव पाटील यांचा ठाम विचार होता. एकंदरितच त्यांचे कार्य आजच्या युवा पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून तरी का होईना, पाहायला मिळेल.
शिक्षणासाठी धडपडणाऱ्या ह्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाच्या जीवनपटामध्ये मुख्य भूमिकेत किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक अशी दिग्गज स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. ट्रान्सएफएक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी निर्मिती केलेल्या "कर्मवीरायण" चित्रपटाची प्रस्तुती 7 वंडर्स चे पुष्कर मनोहर करत आहेत. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.