Kishor Kadam Poem On CM Eknath Shinde Video: वास्तव आणि ज्वलंत! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' व्हिडीओवर सौमित्र यांची कविता, म्हणाले - 'आपण बोलून निघून जायचं…'

EM Eknath Shinde Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ (CM Viral Video) देखील तुफान व्हायरल होत आहे.
Kishor Kadam Poem On CM Eknath Shinde
Kishor Kadam Poem On CM Eknath ShindeSaam Tv
Published On

Kishor Kadam Poem:

राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षण मिळावं याची जोरदार मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावरून सोमवारी सर्वपक्षीयांची बैठक झाली. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर (Social Media) मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ (CM Viral Video) देखील तुफान व्हायरल होत आहे.

Kishor Kadam Poem On CM Eknath Shinde
Shah Rukh Khan Video: 'जवान'च्या यशानंतर शाहरूख खान करतोय Chill; मन्नतचा व्हिडीओ व्हायरल

“आपण बोलून मोकळं व्हायचं, निघून जायचं”, असं ते म्हणाले होते. याच मुद्द्यावरून आता सरकार गंभीर नसल्याची टीका केली जात आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी देखील मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या मुद्द्यावर मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध अभिनेते आणि कवी किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांनी एक जबरदस्त कविता केली आहे. ही कविता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Kishor Kadam Poem On CM Eknath Shinde
Munna Bhai 3 Shooting: 'मुन्नाभाई ३'चे शूटिंग सुरू? संजय दत्त-अरशद वारसीचा सेटवरील व्हिडीओ व्हायरल

किशोर कदम यांनी आपल्या फेसबुक पेजवर ही कविता पोस्ट केली आहे. 'आपण बोलून निघून जायचं..' याच आशयावर त्यांनी ही कविता केली असून सध्या त्यांची ही कविता व्हायरल होत आहे. ही कविता पोस्ट करताना त्यानी माईकचा फोटो देखील पोस्टसोबत शेअर केला आहे. सरकार, राजकारणी, जनता, कार्यकर्ते, मीडिया आणि लोकशाही हे सर्व मुद्दे घेत त्यांनी या कवितेतून सध्या काय परिस्थिती आहे यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

Kishor Kadam Poem On CM Eknath Shinde
Rhea Chakraborty In Bollywood Movie: रिया चक्रवर्ती, संजय लीला भन्सालीच्या चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका?

सौमित्र यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या ज्या विषयाला हात घातला आहे त्याचे कौतुक केले आहे. रोखठोक, 'बोचणारे वास्तव', 'वास्तव आणि ज्वलंत' समस्या, 'वास्तविक सत्य', अशा प्रकारच्या कमेंट्स त्यांच्या चाहत्यांनी केल्या आहेत. अनेकांनी किशोर कदम यांची ही कविता शेअर देखील केली आहे.

सौमित्र यांची कविता -

आपण बोलून निघून जायचं ..

होईल जनतेचं जे व्हायचं

आपल्याला काय..

आपण बोलुन निघुन जायचं...

आपल्याला काय..

केवढी जनता असते समोर

आपल्या जीवाला नस्ता घोर

सगळेच पक्ष लावतात जोर

कोण साधून् कोण चोर

आपली तशीच विचारधारा

जिकडे जसा वाहिल वारा

घालत राहायच्या येरझारा

जातोच निसटुन हातुन पारा

हेच लक्षण लक्षात ठेऊन

आपण येत जात ऱ्हायचं

तहाने सारखं व्याकुळ व्हायचं

जकडे झरा तिथलं प्यायचं

आपल्याला काय...

आपण पिउन निघुन जायचं

आपल्याला काय...

लोकांची पण सहनशक्ती

आपण ताणुन बघत नुस्ती

लाऊन द्यायची त्यांच्यात कुस्ती

कैसा गांव कैसी बस्ती

आपलेच सगळे कार्यकर्ते

आपले कर्ते आपले धर्ते

जिधर घुमाव उधर फिरते

त्यांच्या हातात काय उरते

उद्या परवा विचार करू

नंतर त्यांना काय द्यायचं

आधी बघू काय खायचं

लोकशाहीचंच गाणं गायचं

आपल्याला काय..

आपण गाउन निघुन जायचं

आपल्याला काय..

चोविस तास बातम्या मिळोत

चॅनल्स जाहिराती गिळोत

न्याय अन्यायाशी पिळोत

एफबी इन्स्टा सारे फळोत

खड्डे सगळे तसेच सडोत

निकाल लांबणीवरती पडोत

नशिबाशी कामं अडोत

नको तशा घटना घडोत

जे जे हवं ते ते द्यायचं

तेवढ्या पुरतं त्राता व्हायचं

कशालाही नाही भ्यायचं

आपल्याला काय..

वचनं देउन निघुन जायचं

आपल्याला काय..

रोज लोकां समोर यायचं

रोज लोकां समोर जायचं

माईक बंद चालू असो

आपण फक्तं बोलत ऱ्हायचं

आपल्याला काय ..

सौमित्र.

Kishor Kadam Poem On CM Eknath Shinde
Shilpa Shetty New Look: शिल्पा शेट्टीची कातिल अदा, ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली कर्वी फिगर; VIDEO पाहतच राहाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com