करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूर यांचं काल रात्री निधन झालं. संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असल्याचे समोर आले आहे. पोलो खेळ खेळत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांची शेवटची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे ते दुःखात असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे.
संजय कपूर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. निधानपूर्वी काही तासांआधी त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अहमदाबादमधील विमान अपघातामधील मृत्यूमुखी लोकांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यांनी म्हटलेलं की, अहमदाबादमधील विमान अपघाताची माहिती दुःखद आहे. माझ्या प्रार्थना सर्व मुत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबासोबत आहेत. या काळात देव त्यांना शक्ती देवो, असं त्यांनी म्हटलं आहे.
यानंतरच काही वेळानंतरच त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या या आक्समिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
संजय कपूर- करिष्मा कपूरचा एक्स नवरा (Sunjay Kapur Ex Husband Of Karishma Kapoor)
संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचे २००३ मध्ये लग्न झाले होते. या लग्नानंतर ११ वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला. त्या दोघांना दोन मुले आहेत. समायरा आणि कियान असं त्यांच्या मुलांची नावे आहेत. काल रात्री संजय कपूर यांच्या निधनाची बातमी कळताच करिश्मा कपूरची बहीण करिना कपूर आणि सैफ अली खान तिच्या घरी दाखल झाले.
संजय कपूर यांना श्रद्धांजली वाहिली
संजय कपूर यांच्या निधनाची बातमी कळताच कलाविश्वातून त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.