Foldable iPhone: सॅमसंग, गुगलनंतर आता अ‍ॅपलचा डाव! पहिला फोल्डेबल iPhone लवकरच बाजारात येणार

Dhanshri Shintre

लाँच होण्याची शक्यता

अहवालानुसार अ‍ॅपलने २०२६ मध्ये अपेक्षित फोल्डेबल आयफोनसाठी OLED डिस्प्ले तयार करण्यासाठी खास उत्पादन लाईन उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सॅमसंग डिस्प्ले

अ‍ॅपलच्या आगामी फोल्डेबल आयफोनसाठी OLED डिस्प्लेंचा पुरवठा सॅमसंग डिस्प्ले कंपनीकडून केला जाण्याची शक्यता वर्तवली आहे.

डिझाइन आणि वैशिष्ट्ये

अ‍ॅपलचा फोल्डेबल आयफोन सध्या विकास टप्प्यात असून त्याचे डिझाइन आणि फीचर्स अद्याप अंतिम स्वरूपात आलेले नाहीत.

किंमत

अंदाजानुसार या फोल्डेबल आयफोनची किंमत जवळपास $2300 म्हणजेच सुमारे 1,90,000 रुपये असण्याची शक्यता आहे.

अ‍ॅपलची तयारी

अ‍ॅपल फोल्डेबल स्मार्टफोन क्षेत्रात पहिल्यांदाच उतरणार असून यापूर्वी त्यांनी असा कोणताही फोन लाँच केलेला नाही.

इतर कंपन्यांशी स्पर्धा

सॅमसंग, व्हिवो आणि गुगलने आधीच फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणले असून आता अ‍ॅपल त्यांच्याशी स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.

मोठा स्क्रीन

काही अहवालांनुसार अ‍ॅपलचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन मोठ्या आणि आकर्षक स्क्रीनसह बाजारात येण्याची शक्यता आहे.

फोल्डेबल आयपॅड

काही अहवालांनुसार अ‍ॅपल सध्या फोल्डेबल आयफोनसोबतच फोल्डेबल आयपॅडवरही काम करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

NEXT: फोन चार्ज करताना आग लागण्याचा धोका कसा वाढतो? चार्जिंगदरम्यान लक्षात ठेवा 'या' गोष्टी

येथे क्लिक करा