Phone Charging Safety: फोन चार्ज करताना आग लागण्याचा धोका कसा वाढतो? चार्जिंगदरम्यान लक्षात ठेवा 'या' गोष्टी

Dhanshri Shintre

डुप्लिकेट चार्जर वापरू नका

केवळ कंपनीद्वारे दिलेला किंवा प्रमाणित चार्जर वापरा. नकली चार्जरमुळे सर्किट बिघडू शकते.

रात्रभर फोन चार्ज लावणे

सतत ओव्हरचार्जिंगमुळे बॅटरी गरम होते आणि शॉर्टसर्किटचा धोका वाढतो.

फोन उशाखाली ठेवणे

उष्णता बाहेर न पडल्यास फोन गरम होतो आणि आग लागू शकते.

चार्जिंगदरम्यान फोन वापरणे

गेम खेळणे, व्हिडीओ कॉल्स यामुळे प्रोसेसर आणि बॅटरी दोन्ही गरम होतात.

ओव्हरलोडेड सॉकेटमध्ये चार्ज करणे

एकाच सॉकेटमध्ये अनेक उपकरणे जोडल्यास ओव्हरलोड होऊन स्पार्क होऊ शकतो.

डॅमेज झालेला केबल

तुटलेला वायर, सैल प्लग यामुळे आग लागण्याचा धोका असतो.

चार्जिंगच्या वेळी फोन बिछान्यावर

सॉफ्ट वस्तूंमुळे उष्णता अडकते आणि बॅटरी गरम होते.

फोन 100% पर्यंत चार्ज करणे

80-90% चार्जिंग ही सुरक्षित व बॅटरीसाठी उत्तम असते.

चार्जिंग करताना लक्ष ठेवा

चार्जिंग करताना जागरूक राहा, अनपेक्षित धूम्र किंवा गरम होण्याची लक्षणं दिसल्यास लगेच प्लग काढा.

NEXT: रोजच्या मोबाईल वापरातील 'या' चुका टाळा, नाहीतर फोन लवकरच होईल खराब

येथे क्लिक करा