बॉलिवूडची सुपरकूल अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) कायमच आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहे. तिचे लाखो चाहते दिवाने आहेत. आजवर तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिचा 'हम साथ साथ है' हा चित्रपट तर खूप गाजला आहे. 'हम साथ साथ है' हा चित्रपट 1999 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या आयकॉनिक चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले आहे.
'हम साथ साथ है' चित्रपटाची गाणी खूप गाजली. आजही या गाण्यावर चाहते, कलाकार थिरकताना दिसतात. या चित्रपटातील 'सपना' आता पुन्हा आली आहे. अभिनेत्री करिश्मा कपूरने 'हम साथ साथ है' चित्रपटातील एक गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्याचा व्हिडीओ तिने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'हम साथ साथ है' चित्रपटातील 'म्हारे हिवडा में नाचे मोर' हे गाणे खूप गाजले होते. आता खूप काळानंतर करिश्मा कपूर या गाण्यावर थिरकली आहे.
करिश्मा कपूरने नुकतीच 'इंडियन आयडॉल 15' च्या मंचावर उपस्थिती लावली आणि 'म्हारे हिवडा में नाचे मोर' गाण्यावर भन्नाट डान्स केला. तिच्यासोबत शोमधील इतर लोकही डान्स करताना पाहायला मिळाली. करिश्माने शेअर केलेल्या व्हिडीओला तिने एक हटके कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "सपना मोड ऑन..." तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.
'इंडियन आयडॉल 15'च्या मंचावर करिश्मा कपूरसोबत सूरज बडजात्या देखील आले होते. 'हम साथ साथ है'मध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते. आजही हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस आहे. या चित्रपटात तीन जोड्या दाखवल्या आहेत. यात सलमान खान, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर, सैफ अली खान, तब्बू , आलोक नाथ आणि रीमा लागू हे कलाकार पाहायला मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.