Karishma kapoor Ex Husband passed away: अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूर यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ते पोलो खेळत असताना घडली. संजय यांचे सध्या प्रिया सचदेवशी लग्न झाले होते. अभिनेता आणि लेखक सुहेल सेठ यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
करिश्मा कपूर आणि संजय यांचे २००३ मध्ये लग्न झाले होते, परंतु हळूहळू त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, यामुळे २०१४ मध्ये त्यांच्यात कटुता निर्माण झाली. संजय कपूर उद्योगपती आणि अभिनेता असून त्यांच्या पश्चात त्यांची सध्याची पत्नी प्रिया सचदेव आणि दोन मुलं समायरा आणि कियान असा परिवार आहे.
संजय कपूर हे ऑटोमोटिव्ह उत्पादक सोना कॉमस्टार (पूर्वीचे सोना बीएलडब्ल्यू प्रेसिजन) चे चेअसमॅन होते. याशिवाय, ते अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर संचालक होते आणि विविध व्यावसायिक संस्थांमध्ये सक्रियपणे सहभागी होते. संजय हे एक उत्साही पोलो खेळाडू देखील होते आणि त्यांचा या खेळात सक्रियपणे भाग घेतला.
संजय कपूर हे प्रिया सचदेवला न्यू यॉर्कमध्ये भेटले त्यांच्या दुसऱ्या घटस्फोटादरम्यान त्यांचे नाते प्रियाशी अधिक घट्ट झाले. पाच वर्षांच्या डेटिंगनंतर, या कपलने दिल्लीमध्ये साध्या पद्धतीने लग्न केले यावेळी त्यांचे जवळचे कुटुंब आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.