Sangeet Devbabhali: संगीत देवबाभळी नाटकाचा नवा विक्रम; जाहिरात न करता नाटकाचे प्रयोग हाऊसफुल

Sangeet Devbabhali Natak: दिग्गजांनी गौरविलेले, समीक्षकांनी वाखाणलेले, आणि सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त झालेल्या ' संगीत देवबाभळी ' ने मराठी रंगभूमीवर अढळ स्थान निर्माण करून हे माईलस्टोन नाटक ठरले.
Sangeet Devbabhali Natak
Sangeet Devbabhali NatakSaam Tv
Published On

Sangeet Devbabhali Natak: स्व. मच्छिंद्र कांबळी पावलावर पाऊल ठेवत प्रसाद कांबळी यांनी २२ डिसेंबर २०१७ रोजी भद्रकालीची ५५ वी विठूसावळी नाट्यकृती "संगीत देवबाभळी" ची निर्मिती केली. दिग्गजांनी गौरविलेले, समीक्षकांनी वाखाणलेले, आणि सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त झालेल्या ' संगीत देवबाभळी ' ने मराठी रंगभूमीवर अढळ स्थान निर्माण करून हे माईलस्टोन नाटक ठरले.

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी तर ' १००% मराठी मातीतलं नाटक' या शब्दात गौरव केला. फोर्ब्स इंडिया या जगप्रसिद्ध मासिकाने दखल घेतलेल्या या नाटकाचे छत्रपती संभाजी नगर येथील १५ जून रोजीचे दोन्हीही प्रयोग कुठलीही जाहिरात न करता प्रेक्षकांनी अभूतपूर्व प्रतिसादात ऑनलाईन तिकीट विक्रिलाच हाऊसफुल केले आहेत!

Sangeet Devbabhali Natak
Rasam Rice Recipe: घरच्या घरी १० मिनिटात तयार करा हॉटेल स्टाईल साउथ इंडियन 'रसम राईस', वाचा ही सोपी रेसिपी

महोत्सवी ६०० प्रयोगाकडे वाटचाल करत असलेल्या या नाटकाने आता भाषा, प्रदेश अशी सगळे बंधनं ओलांडत भारतीय रंगभूमीचं नाटक अशी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच बुलढाणा पासून बंगळूर पर्यन्त रसिक प्रेक्षक या नाटकाची वाट पाहत आहे. छत्रपती संभाजी नगर च्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवशी दोन प्रयोग ते हि जाहिरात न करता नाट्यगृहावर तिकीट खिडकी न उघडता फक्त ऑनलाईन बुकिंग द्वारे हाउसफुल होण्याची हि पहिलीच वेळ आहे. भद्रकाली पॅटर्न म्हणून ओळखला जाणाऱ्या ह्या पद्धतीद्वारे मुंबई, पुणे, नाशिक येथील सलग ५० प्रयोगाला हाऊसफुल चा बोर्ड झळकला आहे!

Sangeet Devbabhali Natak
Vicky Kaushal: टायगर आणि पठाणसोबत विकी कौशलची यशराजच्या स्पाय युनिव्हर्समध्ये एन्ट्री? साकारणार 'ही' खास भूमिका

या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, नेपथ्य व दृश्य संकल्पना प्रदीप मुळ्ये संगीतकार आनंद ओक, प्रकाशयोजनाकार प्रफुल्ल दीक्षित, (आवली) शुभांगी सदावर्ते आणि (लखुबाई) मानसी जोशी यांनी साकारली असून सोबत 'भद्रकाली' ची यशस्वी टीम आहे. संभाजी नगर येथील रसिकांच्या विनंतीस मान देऊन लवकरच पुढील प्रयोगाची घोषणा करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com