
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरच्या एक्स पतीचं (Karishma Kapoor Ex Husband) काल निधन झालं. संजय कपूर यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लंडनमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कलाविश्वातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. संजय कपूर यांचे निधी पोलो मॅच खेळताना असताना झाले आहे.
संजय कपूर (Sunjay Kapoor Death) यांचे निधन हॉर्ट अॅटॅकमुळे झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मॅच खेळत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली पडले त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. असं सांगण्यात येत आहे. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण काहीतरी वेगळे असल्याचे समोर आले आहे.
संजय कपूर यांच्या मृत्यूचे खरं कारण (Sunjay kapoor death reason)
मिडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, संजय कपूर हे गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत होते. पोलो खेळत असताना त्यांना गुदमरल्यासारखे झाले. त्यानंतर त्यांनी खेळ थांबवण्यासाठी विनंती केली. यानंतर ते मैदानातून बाहेर निघून गेले. रिपोर्टनुसार, संजय कपूर यांनी मधमाशी गिळली होती. मधमाशीच्या दंशामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कोण होते संजय कपूर?
संजय कपूर बिझनेसमॅन होते. ते सोना कॉमस्टारचे चेअरमन होते. भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या लीडर्समध्ये त्यांचे नाव होते. त्यांना पोलो हा खेळ खूप आवडायचा. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ खेळले होते.
संजय कपूर हे सिनेअभिनेत्री करिष्मा कपूरचे एक्स पती होते. संजय कपूर यांच्या निधनाची बातमी कळताच बहीण करिना कपूर, सैफ अली खान करिष्माच्या घरी दाखल झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.