Ayesha Kapur Wedding : अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रीनं गुपचूप बांधली लग्नगाठ, सीक्रेट वेडिंगचे फोटो पाहा

Ayesha Kapur-Adam Oberoi Marriage : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेली अभिनेत्री लग्न बंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Ayesha Kapur-Adam Oberoi Marriage
Ayesha Kapur WeddingSAAM TV
Published On

बॉलिवूडचे 'बिग बी' (Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रीने गुपचूप लग्न उरकलं आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अमिताभ बच्चन यांच्या 'ब्लॅक' चित्रपटातील अभिनेत्री आहे. तिचे नाव आयशा कपूर (Ayesha Kapur ) आहे. 'ब्लॅक' चित्रपटात अभिनेत्री आयशा कपूरने राणी मुखर्जीची बालपणीची भूमिका साकारली होती.

अभिनेत्री आयशा कपूरचा थाटात लग्नसोहळा पार पडला आहे. आयशाने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. आयशा कपूरच्या बॉयफ्रेंडचे नाव ॲडम ओबेरॉय (Adam Oberoi ) आहे. यांनी दिल्लीत गुरुद्वारामध्ये लग्न केले. आयशा आणि ॲडम शीख परंपरेनुसार लग्न बंधनात अडकले आहे. आयशा कपूरने लग्नात पारंपरिक लूक केला होता. तिने गुलाबी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. त्याला मॅचिंग दागिने आणि हलका मेकअप केला होता. आयशा लग्नात खूपच सुंदर दिसत होती.

आयशाच्या बॉयफ्रेंडन ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघेही एकत्र खूपच छान दिसत होते. आयशा कपूरने वयाच्या 30व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे. सध्या चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून तिच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आयशा कपूरने आपल्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी देखील केली. याचे फोटो आणि व्हिडीओ आयशाने सोशल मिडिया शेअर केले होते.

'ब्लॅक' चित्रपट

'ब्लॅक' चित्रपटात आयशा कपूरने अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या सोबत काम केले आहे. चित्रपटातील आयशाच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील बंपर कमाई केली होती. 2005 मध्ये 'ब्लॅक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर आयशा कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Ayesha Kapur-Adam Oberoi Marriage
Sonali Bendre Injured : सोनाली बेंद्रेच्या हाताला दुखापत; विमानतळावर झाली स्पॉट, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com