'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या रियालिटी शोमुळे आयशा खानला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर देखील आयशा खान (Aayesha Khan) चर्चेत आहे. या शोमुळे आयशा खानची लोकप्रियता दुप्पट वाढली. सलमान खानच्या या रिॲलिटी शोमधून आयशाला नवी ओळख मिळाली असून ती यावेळी सर्वांची लाडकी बनली आहे. अशामध्ये बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर आयशा खानला साऊथच्या चित्रपटामध्ये काम मिळाले. आता तिच्या हाती एक नवा शो लागला असल्याची चर्चा होत आहे.
'बिग बॉस सीझन 17' नंतर आयशा खानचे चाहते तिला आणखी रिॲलिटी शोमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशामध्ये तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयशा खान कलर्सच्या प्रसिद्ध रिॲलिटी टीव्ही शो 'खतरों के खिलाडी 14'मध्ये दिसणार असल्याची चर्चा होत आहे. ती या शोमध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
बॉलिवूड चित्रपट निर्माता रोहित शेट्टीचा टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉस 17 प्रेक्षकांचा सर्वात आवडता शो आहे. सलमान खानच्या बिग बॉस शोनंतर खतरों के खिलाडी हा शो प्रेक्षकांचे सर्वात जास्त मनोरंजन करताना दिसतो. अशा परिस्थितीत आयशा खानने नुकतेच 'खतरों के खिलाडी सीझन 14' बाबत मोठे वक्तव्य केले आहे.
इंस्टेंट बॉलिवूडने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आयशाला खतरों के खिलाडी 14 मध्ये एन्ट्री घेण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना आयशाने सांगितले की, 'तुम्ही पाहिले आहे की मी बिग बॉस शोमध्ये कशी पडत राहिली आणि इथे धोक्यांशी खेळण्याचा प्रश्न आहे. वास्तविक जीवनात मी खूप धोक्यांशी खेळले आहे. पण हो, संधी मिळाली तर नक्की जाईन. कारण काहीतरी होऊ शकते. त्यामुळे माझ्या याबाबत आता काही बोलणे योग्य ठरणार नाही.'
पुढे या व्हिडिओमध्ये, आयशाला हे देखील विचारण्यात आले होते की, बिग बॉस 17 चा विनर मुनवर फारुकी, मनारा चोप्रा आणि अभिषेक कुमार यांची नावे 'खतरों के खिलाडी 14' च्या शर्यतीत आघाडीवर आहेत. यावर आयशा खान म्हणाली, 'प्रत्येकजण मित्र असतो, या शोसाठी त्यांची चर्चा होत आहे हे चांगले आहे आणि त्यांना टीव्ही रिॲलिटी शोमध्ये पाहणे मनोरंजक असेल.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.