बॉलिवूडची (Bollywood) अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनी (Sunny Leone) सध्या चर्चेत आली आहे. सनी लिओनी अनेक रियालिटी शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. आता ती लवकरच नव्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. सनी लिओनीचा ‘ग्लॅम फेम सीझन 1’ (glam fame season 1) लवकरच सुरू होणार आहे. या शोमध्ये सनी लिओनी जजच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.
सनी लिओनीसोबत ईशा गुप्ता आणि नील नितीन मुकेश हे देखील जज असणार आहेत. सनीच्या या शोची प्रेक्षका आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोमध्ये डब्ब रत्नानी, रोहित खंडेलवाल, दिनेश शेट्टी आणि संतोषी शेट्टी यांच्यासाह काही प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील असणार आहेत.
ग्लॅम फेम शो आणि जिओ सिनेमाच्या सोशल मीडिया पेजने ऑडिशन नोंदणी आधीच सुरू झाल्याची घोषणा करून पोस्ट शेअर केली आहे. ग्लॅम फेम शो हे ग्लॅम आणि फॅशनच्या जगात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या आणि जागतिक मंचावर आपली सर्जनशीलता आणि आवड दाखवू इच्छिणाऱ्या प्रतिभांसाठी एक प्रसिद्ध व्यासपीठ आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ग्लॅम फेम शो आणि सनी लिओनीनेही आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या शोच्या संदर्भात पोस्ट शेअर केली होती. या पोस्टला ग्लॅम फेन शोन कॅप्शन देत लिहिले होते की, 'द ग्लॅम फेम सीझन 1 साठी आमच्या जज सनी लिओनीला भेटा. लाइट्स, अप, ग्लॅम ऑन. सनी लिओन द ग्लॅम फेम सीझन 1 जज करण्यासाठी सज्ज आहे. ग्लिट्झ, ग्लॅम आणि प्युअर स्टार पॉवरने भरलेल्या सीझनसाठी सज्ज व्हा!'
सनी लिओनीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. या पोस्टनंतर सनी लिओनी चर्चेत आली आहे. तिचे चाहते या शोची वाट पाहत आहेत. या शोविषयी बोलताना सनी लिओनीने सांगितले होते की, 'मॉडेलला प्रेरणा देऊन त्यांना त्यांच्या करीयरमध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीच आम्ही मदत करणार आहोत. या शोमधून पुढच्या पिढीच्या महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना मार्गदर्शन करण्याची अनोखी जबाबदारी माझ्यावर आहे आणि यासाठी मी खूपच उत्सुक आहे. माझा विश्वास आहे की, या मॉडेल्सनी सध्याचा ट्रेंड समजून घेतला पाहिजे आणि हे व्यासपीठ प्रतिभावान तरुणांना स्फूर्ती देणार आहे. '
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.