आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर करणारी सोनाली बेंद्रे नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. मात्र तिला पाहून सर्वांना धक्का बसला, कारण सोनाली फ्रॅक्चर (Sonali Bendre Fractured Hand) झालेल्या हाताने दिसली. सोनाली बेंद्रेच्या चाहत्यांसाठी ही चिंतेची बाब आहे. तिचा फ्रॅक्चर हाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोनाली बेंद्रे मुंबई विमानतळावर स्पॉट झाली तेव्हा तिचा हात फ्रॅक्चर झाला होता. सोनालीच्या हाताला दुखापत झाली असून ती आता ठीक आहे. तिने पापाराझींशी संवाद देखील साधला. सोनाली बेंद्रे विमानतळावर स्पॉट झाली तेव्हा तिने नेव्ही ब्लू टी-शर्ट आणि हलका निळ्या रंगाची डेनिम जीन्स परिधान केली होती. तिच्या हाताला फ्रॅक्चर बँडेज लावलेले दिसले. तर दुसऱ्या हातात एक छोटी हँडबॅग घेतली होती.
सोनाली बेंद्रेने स्मित हास्या करत पापाराझींशी संवाद साधला आणि आपल्या गाडीत बसून तेथून निघून गेली. पापाराझींनी सोनालीला हाताबद्दल विचारल्यावर ती हसत बोली की, "तूट गया हाथ. गिर गई तो टूट गया" तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोनाली बेंद्रे सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चांगलीच चर्चेत आहे. लवकरच सोनाली बेंद्रेचा 'द हॅपी पावडकास्ट' लाँच होणार आहे. सोनाली बेंद्रे 'द हॅपी पावडकास्ट' हे पॉडकास्ट होस्ट करणार आहे. या पॉडकास्टचा विषय पाळीव प्राण्याचे पालकत्व आणि प्राण्यांची काळजी आहे. 'द हॅपी पावडकास्ट' हा शो 28 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच सोनाली बेंद्रे 'द ब्रोकन न्यूज 2' मध्ये दिसली होती. तिचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.