Karan Johar On Met Gala 2025 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Met Gala 2025: करण जोहरने मेट गाला 2025मध्ये गेलेल्या भारतीय सेलिब्रिटींचे केले कौतुक; पण प्रियंका चोप्राला विसरला

Karan Johar On Met Gala 2025: दिग्दर्शक करण जोहरने मेट गाला 2025 मध्ये सहभागी झालेल्या शाहरुख खान, दिलजीत दोसांझ, कियारा अडवाणी, ईशा अंबानी आणि डिझायनर मनीष मल्होत्रा या कलाकारांचे भरभरून कौतुक केले.

Shruti Vilas Kadam

Karan Johar On Met Gala 2025: मेट गाला 2025 मध्ये भारतीय सेलिब्रिटींच्या भव्य उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. या इव्हेंटमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजद्वारे शाहरुख खान, दिलजीत दोसांझ, कियारा अडवाणी, ईशा अंबानी आणि डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या लुक्सचे भरभरून कौतुक केले. मात्र, या यादीत प्रियंका चोप्रा जोनास हिचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रियंका आणि तिचा पती निक जोनास यांनीही या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती.

शाहरुख खानने मेट गालाच्या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच पाऊल ठेवले आणि त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. करण जोहरने त्याच्या लुकबद्दल लिहिले, "मीटच्या राजाला सलाम. इंटरनेटमुळे तू लाखो लोकांच्या हृदयात प्रवेश केला!!!!! @iamsrk. तू कमाल आहेत!' तसेच, कियारा अडवाणीच्या गरोदरपणातील तेजस्वी लुकचेही त्याने भरभरून कौतुक केले.

दिलजीत दोसांझच्या पारंपरिक पोशाखाला 'Fashion Royalty' असे संबोधून करण जोहरने त्याच्या स्टाईलची प्रशंसा केली. मनीष मल्होत्राच्या मेट गालामधील पदार्पणालाही त्यांनी 'Drama, design and power' असे वर्णन केले. ईशा अंबानी आणि इतर भारतीय सेलिब्रिटींच्या लुक्सचेही त्यांने कौतुक केले.

मात्र, प्रियंका चोप्रा जोनास हिच्या लुकबद्दल त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. प्रियंका आणि निक जोनास यांनी मेट गालाच्या 'Tailored for You' थीमनुसार साजेश्या पोशाखात उपस्थिती लावली होती. प्रियंकाने Balmain चा पांढऱ्या रंगाचा पोल्का डॉट्स असलेला पोशाख परिधान केला होता, ज्यात Bulgari च्या 241-कॅरेट एमराल्ड पेंडंटने तिच्या लुकला चारचाँद लावले. तर, निकने Bianca Saunders च्या डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये त्याच्या लूक उठून दिसत होता.

करण जोहरने प्रियंका चोप्राच्या लुकबद्दल काहीही न बोलल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. काहींनी मुद्दाम दुर्लक्ष केले असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी यामागे काही खास कारण असावे असे म्हटले आहे. या वगळण्यामागचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitesh Rane : वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे; वाळू चोरीवरून मंत्री नितेश राणे आक्रमक

Maharashtra Live Update: सातपुडा बंगला प्रकरण : अंजली दमानिया यांची देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, कार डिव्हायडर तोडून ट्रकला धडकली, ६ मित्रांचा मृत्यू

Jalna : स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणाऱ्याच्या कमरेत पोलीस अधिकाऱ्याने घातली लाथ, व्हिडीओ व्हायरल

Chanakya Niti : लग्नानंतर प्रेम कमी होऊ नये म्हणून हा गुपित मंत्र

SCROLL FOR NEXT