Met Gala 2025: मेट गाला 2025 ची सुरुवात झाली आहे. मेट गाला 2025 च्या दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो पुन्हा व्हायरल झाला, ज्यामध्ये गायक जेसन डेरुलो रेड कार्पेटवरील पायऱ्या चढताना अचानक उलटा पडताना दिसतो. हा फोटो पाहून अनेकांनी वाटले की जेसन डेरुलोचा या इव्हेंटमध्ये अपघात झाला की काय. मात्र, या व्हायरल फोटोमागे एक वेगळेच सत्य आहे.
हा फोटो 2011 च्या कॅन्स फिल्म फेस्टिव्हलमधील आहे, यामध्ये एक व्यक्ती रेड कार्पेटवर स्टंट करण्याचा प्रयत्न करताना पायऱ्यांवरून पडतो. या घटनेचा फोटो नंतर 'जेसन डेरुलो मेट गालामध्ये पडलाय' अशा चुकीच्या कॅप्शनसह हा फोटो शेअर करण्यात आला होता. यामुळे मेट गालामध्ये जेसन डेरुलो या कारकराचा अपघात झाल्याची अफवा सुरू झाली .
हा प्रकार 2015 साली घडला जेसन डेरुलोने स्वतः या अफवेला उत्तर देताना सांगितले की, तो त्या वेळी लॉस एंजेलिसमध्ये रिहर्सलमध्ये होता आणि मेट गालामध्ये उपस्थितच नव्हता. त्याने सोशल मीडियावर "Lmao I'm at rehearsal in LA. Fuq y'all! Lol" असे पोस्ट करून या अफवेला खोडून काढले .त्यावेळी या अफवेचा परिणाम इतका झाला की डेरुलोच्या 93 वर्षीय आजीनेही त्याला फोन करून विचारले की, तो ठीक आहे का. डेरुलोने हसत उत्तर दिले की, "आजी मी ठीक आहे मी त्याठिकाणी गेलोच नव्हतो.
मेट गाला 2025 ची सुरुवात झाली असून यावर्षी भारताचे प्रतिनिधीत्व अभिनेता शाहरुख खान, कियारा अडवाणी, प्रियांका चोप्रा, दिलजीत डोसांझ आधी कलाकार करणार आहेत. तसेच या मेट गालामध्ये अंबानींची लेक ईशा अंबानीने देखील हजेरी लावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.