Karan Johar Net Worth Instagram
मनोरंजन बातम्या

Karan Johar Birthday : आलिशान बंगला, महागड्या कार अन् राजेशाही थाट; करण जोहरची संपत्ती पाहून डोळे गरगरतील

Karan Johar Net Worth : करण कायमच आपल्या चित्रपटांसोबतच फॅशनमुळेही चर्चेत असतो. त्याच्या फॅशनची नेहमीच अवघ्या इंडस्ट्रीमध्ये चर्चा होते. वाढदिवसानिमित्त त्याच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...

Chetan Bodke

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याचा आज वाढदिवस आहे. करण जोहरचा जन्म २५ मे १९७२ रोजी झाला असून आज तो आपला ५२ वा वाढदिवस साजरा करीत आहे. खरंतर त्याची बॉलिवूडमध्ये महागडे चित्रपट बनवण्यासाठी आणि अनेक सुपरस्टार्सना एकत्र आणण्यासाठी तो ओळखला जातो. करण कायमच आपल्या चित्रपटांसोबतच फॅशनमुळेही चर्चेत असतो. त्याच्या फॅशनची नेहमीच अवघ्या इंडस्ट्रीमध्ये चर्चा होते. वाढदिवसानिमित्त त्याच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...

करण जोहरने बॉलिवूडमध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'च्या माध्यमातून अभिनयात डेब्यू केले होते. तर दिग्दर्शन क्षेत्रात त्याने शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' चित्रपटातून डेब्यू केले होते. करण जोहरचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या दिग्दर्शकांच्या यादीत त्याचा समावेश होतो. करण जोहरचं स्वत: च्या मालकीचं धर्मा प्रॉडक्शन नावाची कंपनीही आहे. २०१५ मध्ये अनुराग कश्यपच्या 'बॉम्बे वेल्वेट' चित्रपटात त्याने अभिनय केला होता. त्यासोबतच करण जोहरचा स्वत:चा 'कॉफी विथ करण' हा चॅट शो देखील आहे. त्याचं होस्टिंग स्वत: करण करतो. ज्याची नेहमीच चर्चा होते.

द फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, करण जोहरची १७४० कोटींची संपत्ती आहे. एका जाहिरातीसाठी करण २ कोटी रुपये मानधन घेतो. याशिवाय करण त्याच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या एका एपिसोडसाठी १ ते २ कोटी रुपये घेतो. करण जोहरने २०१० मध्ये ३२ कोटींचे अलिशान घर खरेदी केले होते. सोबतच, मुंबईच्या मलबार हिल्स परिसरातही एक अलिशान घर आहे. त्याची किंमत सुमारे २० कोटी इतकी आहे. करणकडे मर्सडीज आणि एस 560, बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या कार आहेत. त्याची किंमत कोट्यवधींच्या आसपास आहे.

करण जोहरने दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केलेली आहे. त्याचा शेवटचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट रिलीज झालेला होता. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५३ कोटींची कमाई केलेली होती. करणच्या हिट चित्रपटांच्या यादीत 'कभी अलविदा ना कहना', 'स्टुडंट ऑफ द इयर', 'माय नेम इज खान', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'शेरशाह', 'दोस्ताना', 'अग्निपथ', 'ब्रह्मास्त्र', 'राझी' यां चित्रपटांचा समावेश आहे. करणने अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरूख खान, राणी मुखर्जी, काजोल, सलमान खान, आलिया भट्ट, करीना कपूर सह अनेक दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT