बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते अनुराग कश्यप कायमच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. सध्या अनुराग कश्यप नवाझुद्दीन सिद्दीकीच्या ‘हड्डी’मुळे प्रचंड चर्चेत आहे. हे दोघेही या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. नुकतंच अभिनेत्याची एक मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. नुकतंच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत येत्या काळामध्ये,नवाझुद्दीन आणि विक्की कौशलसोबत काम करताना विचार करावा लागेल. असे म्हटले आहे. नेमका तो असा का म्हणाला?, या मागील नेमकं कारण काय?, चला तर जाणून घेऊया....
बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्दर्शक आहेत, जे नवोदित कलाकारांना सादर करतात. यामध्ये बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपचं देखील नाव घेतलं जातं. अनुराग कश्यपच्याच चित्रपटांच्या माध्यमातून विकी कौशल आणि नवाझुद्दिन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. नुकताच एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत, दिग्दर्शक अनुराग कश्यपने येत्या काही दिवसांमध्ये नवाझुद्दिन सिद्दीकी आणि विकी कौशलसोबत काम करताना विचार करावा लागेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामगील नेमकं कारण काय?, सध्या अनुराग कश्यप यांची ही मुलाखत खूपच चर्चेत आली.
अनुराग कश्यप मुलाखतीत म्हणाला, मी विकी किंवा नवाझुद्दीनसारख्या कलाकारासोबत काम करायला घाबरत नाही. पण त्यांचं वाढतं मानधन लक्षात घेता, मला नवाझुद्दीन आणि विक्की कौशल यांची फी देणं शक्य नाही. ते फार मोठे सेलिब्रिटी आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. माझ्या चित्रपटांचे बजेट फार कमी आहेत. जरीही ते फ्लॉप ठरले तरीही मला मोठं नुकसान सहन करावं लागणार नाही. जर चित्रपट फ्लॉप ठरला तर, त्यातले कलाकार नाराज होतील.
अनुराग कश्यप आपल्या मुलाखतीत पुढे म्हणतो, मी रमन राघव सारखी चित्रपट विक्की कौशलसोबत बनवेल का? नक्कीच त्याचं उत्तर नाही आहे. विकी कौशलच्या फीमध्ये आणि चित्रपटाच्या बजेटमध्ये खूप मोठा फरक आपल्याला दिसेल, ही बाब आपण घ्यावी लागेल. विक्कीच्या मानधनातही घसघशीत वाढ झालेली आहे, याचा विचारही आपण करायला हवा. ज्यावेळी मी ‘रमन राघव २.०’संबंधित नवाझुद्दीन समोर ठेवली तेव्हा त्याने मला पैशांचा विचार करु नकोस, थेट असंच सांगितलं. विकीनेही माझ्याकडून पैशाची मागणी न करता माझ्यासोबत काम करण्याची इच्छा दाखवली. अनेक सेलिब्रिटींचे आणि माझे नाते खूप चांगलेय. मी त्यांच्यासोबत यापूर्वी काम केल्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात नाते खूप चांगलेय. अनेकदा वेळेनुरूप बदलावं लागतं, कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये, असं मला वाटतं.
ज्यावेळी अनुरागला, जर विक्कीने मानधनात कपात केली तर, तुम्ही त्याला चित्रपटामध्ये घेणार का?, यावर अनुराग म्हणाला, कायमच दोन्ही बाजूंनी विचार करायला हवा. गरज भासली तर, विक्की माझ्याकडे फुकटमध्ये ही काम करेल. पण ती गोष्ट माझ्या विचारात बसत नाही. त्या उपकारांचे माझ्यावर कायम ओझं असेल. आणि मला त्याचे ऋण कसे फेडायचे हा प्रश्न असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.