Karan Johar: 'ॲनिमल' पाहून रडला करण जोहर, 2 वेळा चित्रपट पाहण्यामागचं सांगितलं कारण...

Karan Johar First Reaction On Animal Movie: एका मुलाखतीदरम्यान, चित्रपट निर्माता करण जोहरने देखील अ‍ॅक्शन-थ्रिलर 'अ‍ॅनिमल' २०२३ या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचे मत व्यक्त केले आहे.
Karan Johar First Reaction On Animal Movie
Karan Johar First Reaction On Animal MovieSaam Tv

Animal Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) बॉबी देओल (Bobey Deol) आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'अ‍ॅनिमल' (Animal Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. अजूनही हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटातील अ‍ॅक्शन आणि बोल्ड सीन्सबद्दल जोरदार चर्चा झाली. हा मुद्दा संसदेपर्यंत पोहचला.

या चित्रपटातील रणबीर कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी यांच्यासह चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्टच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. अशातच एका मुलाखतीदरम्यान, चित्रपट निर्माता करण जोहरने देखील अ‍ॅक्शन-थ्रिलर 'अ‍ॅनिमल' २०२३ या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचे मत व्यक्त केले आहे.

करण जोहरने नुकताच राऊंड द टेबलमध्ये भाग घेतला आणि त्यादरम्यान त्याने या चित्रपटाचे वर्णन 2023 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून केले. हा चित्रपट त्याच्यासाठी खूप भावनिक असल्याचे देखील त्याने सांगितले. करण जोहर या मुलाखतीदरम्यान 'अ‍ॅनिमल' चित्रपटाबद्दल खूपच मोकळेपणाने बोलला. त्याने सांगितले की, 'आतापर्यंत मी 'अ‍ॅनिमल'चे कौतुक भीतीमुळे करत नव्हतो. मला भीती वाटत होती की लोकं मला ट्रोल करतील की मी 'अ‍ॅनिमल'बद्दल बोलत आहे.'

करणने सांगितले की, 'जेव्हा मी सांगितले की 'अ‍ॅनिमल' मला किती आवडला. तर लोकं माझ्याकडे आली आणि मला म्हणाले की 'रॉकी और रानी की कहानी' तू बनवला आहे. हा चित्रपट अ‍ॅनिमलसारख्या चित्रपटासाठी वॅक्सिन आहे. हा चित्रपट अगदी उलट आहे. मी म्हणालो की, मी तुमच्याशी जास्त असहमत होऊ शकत नाही. कारण माझ्यासाठी अ‍ॅनिमल हा या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.'

करणने याविषयी पुढे बोलताना सांगितले की, 'मला या वक्तव्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ आणि खूप धैर्य लागले. कारण जेव्हा तुम्ही लोकांमध्ये असता तेव्हा तुम्हाला जजमेंटची भीती वाटते. जसं कबीर सिंगच्या वेळी होतं. मला हा चित्रपट देखील आवडला होता पण मला वाटत होते की जर मी चित्रपटाचे कौतुक केले तर काही लोकं डोळे तिरके करून पाहतील. पण आता मला याची पर्वा नाही'

Karan Johar First Reaction On Animal Movie
Ira Khan Wedding: आयरा खानच्या लग्नाची जोरदार तयारी, विद्युत रोषणाईने सजले आमिर खान आणि रीना दत्तचे घर; VIDEO व्हायरल

अ‍ॅनिमल चित्रपटातील शेवटच्या सीनबद्दल बोलताना करणने सांगितले की, 'जेथे दोन माणसं भांडायला जातात आणि ते गाणं वाजतं तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. पण फक्त रक्त होते त्यामुळे मला वाटत होते की माझ्यासोबत काही तरी चुकीचे होत आहे किंवा संदीप रेड्डीसोबत काही तरी चुकीचे घडत आहे. मला वाटते की अ‍ॅनिमलचे यश आणि लोकप्रियता गेम बदलणारी आहे. दृढ विश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी मला पण पाहिजे.'

Karan Johar First Reaction On Animal Movie
Rakesh Bedi: 'गदर २' फेम अभिनेत्याची मोठी फसवणूक, आर्मी ऑफिसर असल्याचे सांगून ७५ हजारांना लावला चुना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com