Koffee With Karan 8: 'मी चीटर आहे, 5 जणांना डेट करतोय ', 'कॉफी विथ करण'मध्ये ओरीचा धक्कादायक खुलासा

Orry In Koffee With Karan 8 Show: ओरीने 'कॉफी विथ करण'मध्ये त्याच्या पर्सनल लाइफशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. यावेळी त्याने ५ मुलींना डेट करत असल्याचे सांगितले आहे.
Orry In Koffee With Karan 8 Show
Orry In Koffee With Karan 8 Show Saam Tv

Koffee With Karan 8 Promo:

करण जोहरचा (Karan Johar) प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण 8' चा (Koffee With Karan 8) आठवा सीझन लवकरच संपणार आहे. या शोचा शेवटचा आठवडा आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी करणच्या शोमध्ये बॉलिवूडचा (Bollywood) कोणी प्रसिद्ध सेलिब्रिटी येणार नाहीत तर अभिनेता-कॉमेडियन कुशा कपिला (Kusha Kapila) सुमुखी सुरेश (Sumukhi Suresh) दानिश सैत (Danish Sait) तन्मय भट्ट (Tanmay Bhat) आणि ओरहान अवत्रामणि म्हणजेच ओरी (Orry aka Orhan Awatramani) सहभागी होणार आहे. मागच्या वेळीप्रमाणे हे सारे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर एकत्र येऊन करण जोहरशी गप्पा मारणार आहेत. यावेळी ओरीने त्याच्या पर्सनल लाइफशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. यावेळी त्याने ५ मुलींना डेट करत असल्याचे सांगितले आहे.

कॉफी विथ करणच्या 8 व्या सीझनमध्ये सहभागी होऊन अभिनेता कॉमेडियन कुशा कपिला, सुमुखी सुरेश, दानिश सैत, तन्मय भट्ट आणि ओरहान अवत्रामणी या सर्वांनी एकत्र खूप मजा केली. यावेळी ओरी एकटा येऊन करणशी गप्पा मारताना दिसणार आहे. सर्व सोशल मीडिया इन्फ्लुएंसर करण जोहरला चांगलेच प्रश्न विचारून भांबावून सोडणार आहेत. मागच्या सीझनमध्येही करण जोहरने शेवटच्या एपिसोडमध्ये असंच काहिसं केलं होतं.

करण जोहरने त्याच्या सोशल मीडियावर नुकताच कॉफि विथ करण या शोचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. प्रोमो व्हिडिओमध्ये करण ओरीला त्याच्या डेटिंग लाइफबद्दल विचारतो. यावेळी ओरी सांगतो की, 'तुम्ही माझ्यावर मीम्स बनवत आहेस आणि मी पैसे कमवत आहे'. यानंतर करण ओरीला विचारतो की, 'तू सिंगल आहेस की कुणाला डेट करत आहेस.' यावर ओरी त्याच्याच खास शैलीत म्हणतो, 'मी एकाच वेळी ५ जणांना डेट करत आहे आणि मी चीटर आहे.' ओरीचं उत्तर ऐकून करण त्याला म्हणतो, 'यू आर लिवर अँड नाव्ह यू आर चीटर.'

Orry In Koffee With Karan 8 Show
Akshara Singh: अक्षरा सिंहच्या कार्यक्रमात चाहत्यांनी केला राडा, दगडफेकीत पोलिसांसह 3 जण जखमी

यानंतर, प्रोमोमध्ये कुशा कपिला, सुमुखी सुरेश, दानिश सैत, तन्मय भट्ट यांची झलक दिसते आणि ते करणला सांगतात की त्यांना स्टार किड लाँच करण्याची संधी मिळाली नाही हे त्यांना कसे वाटते. कुशा म्हणतो की, याने तुम्हाला डीप कट दिला असावा. यावर करण म्हणतो की, हो एक डीप कट होता. या सर्वांनी मिळून करणला इतकं भांबावून सोडलं की करण म्हणतो की, 'मला आता माझ्या शोमधून जावे लागेल.'

Orry In Koffee With Karan 8 Show
Merry Christmas: कतरिना कैफ-विजय सेतुपतीच्या 'मेरी ख्रिसमस'ने IMDb वर मिळवले इतके रेटिंग?, 'अंधाधुन' चित्रपटालाही टाकलं मागं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com