Ranya Rao Gold Smuggling Case x
मनोरंजन बातम्या

Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीला १०२ कोटी रुपयांचा दंड, सोने तस्करीमुळे झाली होती अटक

Ranya Rao : सोने तस्करी केल्याने कन्नड अभिनेत्री रान्या रावच्या अडचणी वाढल्या आहेत. तिला १०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तिच्यासह आणखी तिघांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.

Yash Shirke

  • अभिनेत्री रान्या राववर सोने तस्करी प्रकरणी १०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

  • ३ मार्च रोजी दुबईहून परतताना तिला १४.८ किलो सोन्यासह पकडले गेले होते.

  • सध्या रान्या राव आणि सोने तस्करी प्रकरणातील इतर आरोपी बंगळुरू मध्यवर्ती तुरुंगात आहेत.

Ranya Rao Gold Smuggling : सोने तस्करी प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या राव बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात आहे. या तस्करी प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, या प्रकरणी गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तिच्यावर १०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ३ मार्च रोजी दुबईहून परतताना बंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रान्याला १४.८ किलो सोन्यासह पकडले होते.

अभिनेत्री रान्या रावला सोने तस्करी प्रकरणात डीआरआयने २,५०० पानांची नोटीस दिली आहे. या प्रकरणी रान्याला १०२ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. तिच्यासह तीन जणांना ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावला आहे. सध्या सोने तस्करी प्रकरणातील रान्या रावसह इतर आरोपी बंगळुरू मध्यवर्ती तुरुंगात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी रान्या रावला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरु झाली. रान्या २०२३ ते २०२५ दरम्यान ४५ वेळा दुबईला गेल्याचे उघड झाले. दुबईवरुन भारतामध्ये परतत असताना रान्याकडून जितके सोने ताब्यात घेण्यात आले, त्याची किंमत १२.५६ कोटी रुपये इतकी होती असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रान्या रावकडून ताब्यात घेतलेले सोने तिला दुबई विमानतळावरुन तरुण कोंडुरु राजू यांनी दिले होते, ही माहिती समोर आली आहे. तरुण कोंडुरु राजू हा तेलुगू चित्रपटात काम करतो. त्याच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. अमेरिकन पासपोर्टचा गैरवापर केल्याचे डीआरआयने न्यायालयात म्हटले होते. या सोने तस्करी प्रकरणात रान्या रावच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT