Tejas Official Trailer Instagram
मनोरंजन बातम्या

Tejas Official Trailer: “अब जंग होगी!” वायुसेना दिनानिमित्त कंगनाच्या ‘तेजस’चा धमाकेदार अ‍ॅक्शन ट्रेलर रिलीज...

Tejas Trailer Out: कंगना रणौतच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘तेजस’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Kangana Ranaut Film Tejas Trailer Released

बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत सध्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘तेजस’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा धडाकेबाज टीझर प्रदर्शित झाला होता. टीझरनंतर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. पंगा गर्ल अभिनेत्री या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आज भारतीय वायुसेना दिवस... वायुसेना दिनाचे औचित्य साधत कंगनाच्या ‘तेजस’ चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना ॲक्शन तडका आणि अभिनेत्रीचा लूक सर्वाधिक लक्ष वेधत आहे. हा अभिनेत्रीचा लक्षवेधी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेत्री चित्रपटामध्ये वैमानिक तेजस गिल यांच्या भूमिकेत दिसत आहे.

नुकताच चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. RSVP निर्मित ‘तेजस’च्या ट्रेलरच्या सुरुवातीला,“भारत को छेडेंगे तो छोडेंगे नहीं” हा दमदार डायलॉग आहे. एकंदरीतच ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्रीच्या जबरदस्त डायलॉगने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

हे जबरदस्त डायलॉग नक्कीच प्रेक्षकांची देशभक्ती भावना जागृत करणारे आहेत. ट्रेलर शेअर करताना कंगनाने कॅप्शन दिले की, “आता आकाशातून शत्रूंवर हल्ला होणार... आता युद्धाची घोषणा होणार! हा तो भारत आहे, जो छेड काढली तर सोडणार नाही. ‘तेजस’चा ट्रेलर प्रदर्शित.”

सर्वेश मेवाडा दिग्दर्शित आणि लिखित चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत कंगना व्यतिरिक्त अंशुल चौहान, वरुण मित्रा, पंकज त्रिपाठी आणि आशिष विद्यार्थी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जबरदस्त ॲक्शन चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. चित्रपटामध्ये कंगना आणि वरुण मित्रा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.

कंगना रनौतच्या एकूण कामाबद्दल बोलायचे तर, कंगना ‘चंद्रमुखी २’मुळे तर चर्चेत आहेच, पण ती लवकरच ‘तेजस’ आणि ‘इमरजेन्सी’ या दोन चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. २८ सप्टेंबरला कंगनाचा ‘चंद्रमुखी २’ हा पॅन इंडिया सिनेमा हिंदी, तामिळ,तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. ‘इमरजेन्सी’ चित्रपटामध्ये कंगनाने स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पात्र साकारलं आहे. कंगनानेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी! किश्तवाडमध्ये पूरस्थिती; ३० जणांचा मृत्यू, १२० जण जखमी

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला हत्याकांड प्रकरणात अटक, सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर कारवाई

Bihar SIR : वगळलेल्या ६५ लाख मतदारांची यादी कारणांसहित प्रसिद्ध करा; निवडणूक आयोगाला 'सुप्रीम' आदेश

Nashik News: 36 दिवसांपासूनचे नाशिकमधील आदिवासींचे आंदोलन चिघळले; पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट|VIDEO

Maharashtra Live News Update: बिऱ्हाड आंदोलकांनी पुन्हा नव्याने दिला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT