ऐकलंत... राज्यात मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बवरून राजकारण तापलंय. याच ऑडिओ बॉम्बवरून भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईकांनी थेट राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत दिलेत. खरंतर, ऑडिओ क्लिपबाबत बोलताना मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला असला तरी त्यांच्या विधानानं राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. येत्या 2 ते 3 महिन्यांत राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईकांनी केलाय. तर दुसरीकडे, शिंदेसेनेचे नेते आनंद परांजपेंनी मात्र नाईकांना खोचक टोला लगावलाय...
विशेष म्हणजे, गणेश नाईकांच्या विधानाआधी विरोधकांकडूनही अशाच प्रकारचे दावे करण्यात आलेत. ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आगामी काही महिन्यांत देशात व राज्यात मोठी राजकीय गडबड होईल, अशी शक्यता वर्तवली होती...
दरम्यान, राजकीय नेत्यांनी केलेल्या भाकीतासंदर्भात राजकीय विश्लेषकांनी काय म्हटलंय तेही पाहूयात...
गेल्या काही महिन्यात विविध मुद्यांवर महायुतीतल खदखद वारंवार बाहेर आली आहे. दुसरीकडे सध्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता, नागरिकांमध्येही असंतोषाचं वातावरण पाहायला मिळतंय. अगदी जेनझीपासून विरोधकांपर्यंत सगळेच थेट रस्त्यावर उतरलेत. याच पार्श्वभूमीवर नेत्यांकडून सतत वर्तवल्या जाणाऱ्या राजकीय भूकंपाच्या इशाऱ्यांमुळे पडद्यामागे नेमकं काय शिजतंय?.... आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उलथापालथ होणार का ? याची उत्सुकता सर्वांना लागलीये..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.