Nushrratt Bharuccha Came From Israel: इस्राइलमध्ये ‘नॉट रिचेबल’ झालेली नुसरत भरुचा सुखरुप; लवकरच भारतात येणार

Nushrratt Bharuccha Latest News: लवकरच नुसरत भरुचा भारतात परतणार असल्याची माहिती मिळत आहे.
Nushrratt Bharuccha Successfully Reached Israel Airport
Nushrratt Bharuccha Successfully Reached Israel AirportInstagram
Published On

Nushrratt Bharuccha Successfully Reached Israel Airport

पॅलेस्टाईनने केलेल्या मिसाईल हल्ल्यानंतर इस्राइलमधील परिस्थिती चिघळली आहे. नागरिकांना जीव मुठीत धरुन तिथे राहावं लागत आहे. इस्राइलच्या या युद्धभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा देखील अडकली होती. रविवारी सकाळी अभिनेत्री नुसरत भरुचा इस्राइलमध्ये अडकल्याची बातमी समोर आली होती.

नुसरत भरुचा इस्राइलमध्ये अडकल्याचे बातमी समोर येताच अनेक सेलिब्रिटी मित्रांसह तिचे चाहते देखील अस्वस्थ झाले होते. आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच अभिनेत्री भारतात परतणार असल्याची माहिती मिळत आहे.

Nushrratt Bharuccha Successfully Reached Israel Airport
Nushrratt Bharucha : अभिनेत्री नुसरत भरुचा युद्धभूमी इस्राइलमध्ये अडकली; संपर्क होत नसल्याची सहकाऱ्यांची माहिती

इस्राइलमध्ये अडकलेल्या नुसरतसोबत तिच्या टीमने संपर्क केला असून ती परदेशामध्ये सुखरुप आहे. यावेळी अभिनेत्री भारतात येण्यासाठी ती विमानतळावर सुद्धा पोहोचल्याची माहिती मिळत आहे. काही तासांतच अभिनेत्री भारतात परतणार आहे. नुसरतचा शनिवारी दुपारपासून संपर्क होत नव्हता. यामुळे आता संपर्क झाला असून तिच्या कुटुंबीयांसोबत चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणता येईल.

Nushrratt Bharuccha Successfully Reached Israel Airport
Kaala Paani Official Trailer: काळजात धडकी भरवणाऱ्या ‘काला पाणी’चा रहस्यमयीन ट्रेलर प्रदर्शित, वेबसीरीजमध्ये दिसणार मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी

माध्यमांना माहिती देताना नुसरतच्या टीममधील सदस्याने सांगितलं की, “नुसरत इस्राइलमध्ये हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती. अभिनेत्रीच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२:३० च्या सुमारास शेवटचा संपर्क झाला होता. जोपर्यंत तिचा सहभाग होत होता, तोपर्यंत ती एका तळघरात होती आणि सुरक्षित होती. त्यानंतर तिच्यासोबत कोणताही संपर्क झाला नाही.”

Nushrratt Bharuccha Successfully Reached Israel Airport
Mahadev Betting App Case: ज्यूस विकणारा विक्रम चंद्राकर, ५००० कोटींचं नेटवर्थ; कसं पसरवलं 'महादेव बेटिंग अ‍ॅप'चं साम्राज्य?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com