Mahadev Betting App Case: ज्यूस विकणारा विक्रम चंद्राकर, ५००० कोटींचं नेटवर्थ; कसं पसरवलं 'महादेव बेटिंग अ‍ॅप'चं साम्राज्य?

Sourabh Chandrakar: बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरपासून ते कपिल शर्मापर्यंत असे एकूण १५ ते १६ सेलिब्रिटी ईडीच्या (ED) रडारवर आहेत.
Mahadev Betting App Case
Mahadev Betting App CaseSaam Tv
Published On

Mahadev Book App:

एक अशी गेम ज्यामध्ये खेळलं तर जायचं पण निर्णय आधीच व्हायचा की कोण हारणार? पण हारणाऱ्या व्यक्तीला हे माहिती नसायचे. या गेमिंग अ‍ॅपने लोकांची फसवणूक करून कोट्यवधी रूपये कमावले. हे गेमिंग अ‍ॅप दुसरं तिसरं कोणतं नसून ते आहे 'महादेव बेटिंग अ‍ॅप' (Mahadev Betting App) या बेटिंग अ‍ॅपची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. कारण या अ‍ॅपमुळेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrities) अडचणीत आले आहेत. बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरपासून ते कपिल शर्मापर्यंत असे एकूण १५ ते १६ सेलिब्रिटी ईडीच्या (ED) रडारवर आहेत. यामधील अनेक सेलिब्रिटींना ईडीने नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Mahadev Betting App Case
Mission Raniganj 2nd Day Collection: अक्षय आणि परिणीतीच्या ‘मिशन रानीगंज’ला विकेंडला संमिश्र प्रतिसाद; शनिवारी कमावले इतके कोटी...

'महादेव बेटिंग अ‍ॅप'चा हा घोटाळा ५००० कोटी रुपयांचा आहे. या बेटिंग अ‍ॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याने आपला मित्र रवी उप्पलच्या मदतीने हे 'महादेव बेटिंग अ‍ॅप' सुरू केले आणि त्याने लोकांना चुना लावला. हे दोघेही दुबईमधून हे अ‍ॅप चालवतात. छत्तीसगडच्या सौरभचे ज्यूसचे दुकान होते. ज्यूस विकता विकता आज तो सट्टेबाजीचा सौदागर झाला आहे. सौरभने हे अ‍ॅप कसं तयार केलं?, त्याने या अ‍ॅपचं साम्राज्य कसं पसरवलं?, त्याने ५००० कोटींची कमाई कशी केली?, त्याच्या जाळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटी कसे अडकले? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून मिळणार आहेत...

महादेव ज्यूस सेंटर -

सौरभ चंद्राकरचे छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या भिलाई येथे महादेव ज्यूस सेंटर नावाने एक छोटेसे ज्यूसचे दुकान होते. ज्यूस विकून तो थोडं फार पैसे कमावत होता. पण त्याला मोठी कमाई करायची होती. त्याची स्वप्न मोठी होती. एक ज्यूस सेंटर चालवणाऱ्या सौरभने काही दिवसांमध्ये अनेक ज्यूसची दुकानं सुरू केली. त्याने छत्तीसगडच्या अनेक शहरांमध्ये ३० ज्यूस सेंटर सुरू केले.

Mahadev Betting App Case
Nushrratt Bharucha : अभिनेत्री नुसरत भरुचा युद्धभूमी इस्राइलमध्ये अडकली; संपर्क होत नसल्याची सहकाऱ्यांची माहिती

असं सुरू झालं महादेव गेमिंग अ‍ॅप -

२८ वर्षांच्या सौरभला ऑनलाइन सट्टा खेळण्याची सवयी होती. कोरोना काळामध्ये त्याची ही सवयी जास्तच वाढली. लॉकडाऊनमध्ये तो ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपवर सट्टा लावायचा. त्यानंतर सौरभच्या डोक्यात आयडिया आली त्याने स्वत:चे बेटिंग अ‍ॅप सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर यामध्ये त्याचा मित्र रवी उप्पलची एन्ट्री झाली. दोघांनी कोरोनामध्ये बेटिंग अ‍ॅप तयार केले. ज्याचे नाव त्यांनी 'महादेव अ‍ॅप' असे ठेवले. हे अ‍ॅप सोशल मीडियावर अल्पावधीतच पसरले ज्याचे काही दिवसांमध्येच ५० लाख मेंबर झाले. कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये नागरिकांमध्ये गेमिंगची क्रेझ खूपच वाढली होती. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण गेम खेळण्यात व्यग्र होते. या गेमिंग अ‍ॅपनेच सर्वांची फसवणूक केली.

Mahadev Betting App Case
Singer Jasmine Sandlas : लॉरेन्स बिश्नोई गॅगच्या टार्गेटवर अजून एक पंजाबी सिंगर; दिल्ली विमानतळावर उतरताच आला धमकीचा कॉल

५००० कोटींची उलाढाल -

सौरभने सर्वात जास्त छत्तीसगडमधील लोकांनाच चुना लावला. मागच्यावर्षी हे प्रकरण जेव्हा प्रकाशझोतात आले तेव्हा सर्वांना धक्का बसला. कारण या गेमिंग अ‍ॅपच्या बँक अकाऊंटमध्ये एका वर्षामध्ये जवळपास ५००० कोटींची उलाढाल झाली होती. याप्रकरणी छत्तीसगडमधून अनेकांना अटक केली होती. महादेव अ‍ॅप गेल्या ४ वर्षांपासून सुरू आहे. या अ‍ॅपचे हेडक्वार्टर दुबईमध्ये आहे. सौरभ आणि रवी दुबईमधून हे अ‍ॅप चालवतात. भारताव्यतिरिक्त नेपाळ, बांगलादेशसह अने देशांमध्ये हे अ‍ॅप पसरले आहे. महादेव ऑनलाइन बुक लाँच झाल्यापासून सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. सध्या भारतामध्ये या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली असली तरी इतर देशांमध्ये हे अ‍ॅप सुरू आहे.

Mahadev Betting App Case
Maharashtrachi Hasyajatra: ओंकार भोजनेच्या तोंडून 'ते शब्द' एकूण नम्रता झाली भावुक, पाहा VIDEO

काय आहे महादेव अ‍ॅप?

महादेव अ‍ॅप हे पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल यांसारख्या विविध लाइव्ह गेम्समध्ये बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि इतर काही राज्य पोलिसांनी त्या अ‍ॅपवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सौरभ चंद्राकर हा रवी उप्पल हे दुबईतून हे बेटिंग अ‍ॅप चालवतात. या अ‍ॅपचे नेटवर्क फक्त भारतच नाही तर नेपाल आणि बांगलादेशसह अन्य देशामध्ये देखील पसरले आहे.

Mahadev Betting App Case
Bigg Boss 17 Most Expensive Contestant: अंकिता लोखंडे ठरली बिग बॉसची सर्वात महागडी स्पर्धक, एका आठवड्याचं मानधन ऐकूण व्हाल हैराण...

बॉलिवूड सेलिब्रिटी अडचणीत -

या बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकार याचं याचवर्षी फेब्रुवारीमध्ये दुंबईत लग्न झालं होतं. या लग्नासाठी सौरभने जवळपास २०० कोटींची उधळपट्टी केली होती. सौरभच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. इतकंच नाही, तर सौरभच्या लग्नात परफॉर्मस करण्यासाठी सेलिब्रटींनी कथितपणे पैसे घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे सेलिब्रिटी अडचणीत आले आहेत. याप्रकरणी ईडीने रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, हुमा कुरेशी यांना नोटीस बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. या सेलिब्रिटींसह आणखी काहींनी या अ‍ॅपच्या प्रमोशनसाठी जाहिरात केली होती.

Mahadev Betting App Case
Bobby Darling Viral Video: मेट्रोत बॉबी डार्लिंगनं तरुणाला धू धू धू धूतलं...; नेमकं काय घडलं? पाहा व्हायरल VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com