Nushrratt Bharucha : अभिनेत्री नुसरत भरुचा युद्धभूमी इस्राइलमध्ये अडकली; संपर्क होत नसल्याची सहकाऱ्यांची माहिती

Nushrratt Bharucha Stuck In Israel : नुसरतसोबत शनिवारी दुपारपासून कोणताही संपर्क झालेला नाही.
Nushrratt Bharucha Stuck In Israel
Nushrratt Bharucha Stuck In Israel Saam Tv
Published On

Nushrratt Bharucha News :

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान बॉलिवूडमधूनही अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. नुसरतच्या टीममधील एका सदस्याने याबाबत माहिती दिली आहे.

नुसरतसोबत शनिवारी दुपारपासून कोणताही संपर्क झालेला नाही. माध्यमांना माहिती देताना नुसरतच्या टीममधील सदस्याने सांगितलं की, नुसरत इस्रायलमध्ये अडकली आहे. हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती. त्यांच्या टीमने दिलेल्या मेसेजनुसार शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास शेवटचा संपर्क झाला होता. (Latest News)

Nushrratt Bharucha Stuck In Israel
Singer Jasmine Sandlas : लॉरेन्स बिश्नोई गॅगच्या टार्गेटवर अजून एक पंजाबी सिंगर; दिल्ली विमानतळावर उतरताच आला धमकीचा कॉल

ज्यावेळी संपर्क झाला तेव्हा ती एका तळघरात होती आणि सुरक्षित होती. त्यानंतर मात्र तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. आशा आहे सुरक्षित परतेल, असं तिच्या टीममधील सदस्याने म्हटलं आहे. (Bollywood News)

Nushrratt Bharucha Stuck In Israel
Bigg Boss 17 Most Expensive Contestant: अंकिता लोखंडे ठरली बिग बॉसची सर्वात महागडी स्पर्धक, एका आठवड्याचं मानधन ऐकूण व्हाल हैराण...

'अकेली' सिनेमाची आठवण

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये अभिनेत्री नुसरत भरुचाचा 'अकेली' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एक मुलगी काही कारणाने इराकमधील युद्धात अडकते. हा चित्रपट युद्धाच्या भोवऱ्यात अडकलेल्या एकाकी मुलीच्या घरी परतण्याच्या संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटाची कथा खऱ्या आयुष्यात नुसरतसोबत घडेल असा विचारही कुणी केला नसेल.

पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्राइलवर रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ला केलाय. या हल्ल्यामुळे इस्त्राइल देश हादरून गेला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत अनेक नागरिकांचा जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यानंतर इस्राइलनेही युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे इस्राइल-पॅलेस्टाईन वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

भारताकडून मार्गदर्शक सूचना जारी

इस्त्रायलमधील स्थितीनंतर तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडा. संवेदनशील भागात जाऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच हेल्पलाइनसाठी परराष्ट्र मंत्रालयानं +97235226748 हा फोन नंबर दिला आहे. तसेच मदतीसाठी consl.telaviv@mea.gov.in हा ई-मेल आयडी जाहीर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com