Kangana Ranaut 1st Look In Chandramukhi 2 Instagram @kanganaranaut
मनोरंजन बातम्या

Chandramukhi 2 : कुरळे केस, करडी नजर, शाही थाट; कंगनाचा 'चंद्रमुखी 2'मधील फर्स्ट लूक आऊट

Chandramukhi 2 Kangana Ranaut Look Reveal : कंगनाचा 'चंद्रमुखी 2' चित्रपटातील लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kangana Ranaut First Look Of Chandramukhi 2 : २००५ साली आलेल्या 'चंद्रमुखी' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटाचा सिक्वेल चित्रपट लवकर यावा, अशी इच्छाही प्रेक्षकांनी व्यक्त केली होती. तर आता लवकरच 'चंद्रमुखी २'(Chandramukhi 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात कंगना आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच कंगनाचा चित्रपटातील लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

कंगना(Kangana Ranaut) नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकत असते. या चित्रपटात कंगना 'चंद्रमुखी' हे पात्र साकारणार आहे. चित्रपटातील कंगनाचा लूक खूप हटके आहे. कंगनाने सोशल मीडियवरुन तिच्या लूकचा पोस्टर शेअर केला आहे.

'चंद्रमुखी २' हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. कंगना 'चंद्रमुखी २' चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. त्यामुळे चाहते कंगनाच्या या चित्रपटासाठी खूप आतुर आहेत.

कंगनाने सोशल मीडियावर तिच्या लूकचं पोस्टर शेअर केले आहे. कंगनाच्या या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंगनाने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. अगदी चंद्रमुखीसारखी साडी कंगनाने नेसली आहे. कुरळे केस आणि भरगच्च दागिण्यांमध्ये कंगना अगदी सुंदर दिसत आहे. कंगनाच्या हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे.

'तिचे सौंदर्य आणि पोझ सहज लक्ष वेधून घेते. चंद्रमुखी २ मधून कंगना रनौतचा हेवा वाटण्यासारखा, प्रभावी आणि भव्य असा पहिला लुक सादर करत आहोत. या गणेश चतुर्थीला तामिळ, हिंदी, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्ये चित्रपट रिलीज होणार आहे.' असं कॅप्शनही या पोस्टला दिलं आहे.

याआधीही एकदा कंगनाच्या लूकची छोटी झलक दाखवण्यात आली होती. त्यामध्ये फक्त कंगनाच्या डोळ्यांची झलक दाखवली होती. तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता कंगनाचा संपूर्ण लूक प्रदर्शित झाला आहे. कंगनाच्या या लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

कंगनाच्या वर्कफंटबद्दल बोलायचे तर, कंगनाचा 'चंद्रमुखी २' हा चित्रपट १९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. कंगनाचा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित 'इमरजन्सी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT