Priya Berde Serial: प्रिया बेर्डेचं टीव्ही जगतात पुनरागमन ; नव्या मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका

Priya Berde In Sindhutai Mazi Mai : १५ ऑगस्टपासून 'सिंधुताई माझी माई' ही मालिका कलर्स मराठीवर टेलिकास्ट होणार आहे.
Priya Berde In Sindhutai Mazi Mai
Priya Berde In Sindhutai Mazi MaiSaam TV

Priya Berde Comeback In TV Serial : टीव्हीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनाथांची संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या सिंधुताई सकपाळ याच्या जीवनावर आधारित ही मालिका आहे. १५ ऑगस्टपासून 'सिंधुताई माझी माई' ही मालिका कलर्स मराठीवर टेलिकास्ट होणार आहे.

मराठी मालिका विश्वात प्रथमच 'सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची' या मालिकेतून सिंधुताई सकपाळ यांची चरित्रकथा पाहायला मिळणार आहे. सिंधुताईंच्या आयुष्यातील व्यस्था मालिकेतून मांडण्यात येणार आहेत.

Priya Berde In Sindhutai Mazi Mai
Ghoomer Official Trailer: 'Life Is Magic Game...', अभिषेक-संयमीची जोडी पहिल्यांदाच झळकणार; 'घुमर'चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

'सिंधुताई माझी माई' या मालिकेच्या स्टारकास्टने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण सिंधुताईंची भूमिका या मालिकेत कोण साकारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. मालिकेतील कलाकारांचे चेहरे हळूहळू समोर येत आहेत.

मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आहे. अभिनेते किरण माने या मालिकेत सिंधुताईंच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. तर एका लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी आणि अभिनेत्री सिंधुताईंच्या म्हणजे चिंधीच्या आजीची भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री प्रिया बेर्डे या चिंधीच्या आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रिया बेर्डे अनेक सात वर्षांनी पुन्हा मालिका जगतात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तर प्रिया बेर्डे सिंधुताईंची भूमिका साकारणार असे म्हटले जात होते. परंतु आता त्यांची भूमिका रिव्हील झाली आहे.

१५ ऑगस्टपासून संध्याकाळी ७ वाजता 'सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची' ही नवीन मालिका कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. चिंधीच्या भूमिकेत अनन्या टेकवडे दिसणार आहे. तर किरण माने या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com