Ghoomer Official Trailer: 'Life Is Magic Game...', अभिषेक-संयमीची जोडी पहिल्यांदाच झळकणार; 'घुमर'चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

Ghoomer Trailer Out: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘घुमर’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Ghoomer Official Trailer Shared On Social Media
Ghoomer Official Trailer Shared On Social MediaSaam Tv
Published On

Ghoomer Official Trailer Shared On Social Media: ऑगस्ट महिन्यात अनेक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. या महिन्यात अनेक बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘घुमर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करत घोषणा करण्यात आली होती. आता नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

चित्रपटात अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्याच्या अभिनयाची देखील कमालीची चर्चा होत आहे.

Ghoomer Official Trailer Shared On Social Media
Tamil Actor Mohan Died : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते मोहन यांचे निधन

'चीनी कम', 'पा' आणि 'पॅडमॅन'सारख्या सुपरहिट आणि सामाजिक संदेश देणाऱ्या विशेष चित्रपटांसाठी दिग्दर्शक आर बाल्कीची ओळख आहे. दिग्दर्शक आर बाल्कीने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्या चित्रपटाने प्रेक्षकांना एक वेगळीच उमीद दिली आहे. (Bollywood Film)

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘घुमर’मध्ये अभिषेक बच्चनने एका गेम ट्रेनरचे पात्र साकारले. त्यात तो खेळाडूंना पॅराप्लेजिकचे प्रशिक्षण देताना दिसत आहे. त्या खेळाडूंमध्ये अभिनेत्री सैयामी खेर देखील दिसणार आहे. अभिनेत्रीने एका खेळाडूचे पात्र साकारले आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षक चांगलेच भारावून गेले आहेत.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये, सुरूवातीला आपल्याला अभिषेक बच्चनच्या डायलॉग ऐकू येतो, त्यामध्ये तो मद्यधुंद अवस्थेत दिसून येत आहे. चित्रपटात सैयामी खेरच्या बॉयफ्रेंडचे पात्र अंगदने साकारलेय. सैयामीसाठी तिचे प्रेम महत्वाचे नसते, तर तिच्यासाठी क्रिकेट महत्वाचे असते. सैयामीची भारतीय संघात निवड झाल्यानंतर तिच्या आयुष्यात मोठं वादळ येतं.

सैयामीला एका अपघातात कायमचा एक हात गमवावा लागतो. तेव्हापासून तिच्या आयुष्यात खऱ्या परिस्थितीत संघर्ष सुरू होतो. मोठ्या वादळानंतर सैयामीला तिला कसा संघर्ष करावा लागतो, करत असलेल्या संघर्षाचे तिला काय फळ मिळणार? त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मिळेल.

Ghoomer Official Trailer Shared On Social Media
Genelia Deshmukh Turns At 36: देशमुखांची सून ‘लय भारी’! ४०० स्पर्धकांमधून जेनेलियाची चित्रपटासाठी निवड; असा होता अभिनेत्रीचा फिल्मी प्रवास

चित्रपटात सैयमीने एका डावखोऱ्या गोलंदाजाचे पात्र साकारले. तिच्या आयुष्यात झालेल्या एका अपघातानंतर सैयमीला ट्रेनिंग घेण्याची नितांत गरज होती. कारण ति आधी उजव्या हातानेही तिचे काम करायची पण अपघातात उजवा हात गमावल्यामुळे तिने खूपच ही तारेवरची कसरत केली. अशा परिस्थितीत सैयमीने मुरली कार्तिककडून खास प्रशिक्षण घेतले आहे. मुरली कार्तिक त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी नेहमीच ओळखला जातो.

Ghoomer Official Trailer Shared On Social Media
HBD Kajol : १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये झळकणारी काजोल कोट्यवधींची मालकीण; पण शिक्षण अर्धवट राहिले म्हणून...

चित्रपटाची कथा हंगेरियन नेमबाज कॅरोली टाक्स हिच्यापासून घेतलेली आहे. कॅरोलीच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाल्यानंतर तिने डाव्या हाताने खेळत दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली होती. आर. बल्की या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत, तर प्रमुख भूमिकेत अभिषेक आणि सैयामीसह अंगद बेदी, शबाना आझमी यांच्यासारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com