अभिनेत्री कंगना रणौतच्या बहुचर्चित 'इमरजन्सी' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर आज म्हणजेच, १४ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटील आला आहे. ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्याने सोशल मीडियावर याची तुफान चर्चा रंगली आहे.
चित्रपटाचे कथानक स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. या बायोपिकमध्ये, स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने साकारली आहे. अभिनेत्रीच्या अभिनयाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. तिने चित्रपटात आपली भूमिका अतिशय चोखपणे साकारली आहे. कंगना रणौत, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, सतिश कौशिक, भूमिका चावलासह अशी अनेक तगडी स्टारकास्ट चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे.
चित्रपटाचे कथानक इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळापूरतीचं आहे. त्यांनी १९६६ पासून पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली होती. पंतप्रधान पदावर असताना इंदिरा गांधी यांनी १९७१ साली झालेले भारत- पाकिस्तान युद्ध, आणीबाणीच्या काळात घेतलेले निर्णय, मुलभूत अधिकारांवर आणलेली गदा यांसारखे महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले होते.
हे सर्व मुद्दे प्रेक्षकांना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्याशिवाय, ट्रेलरमध्ये, इंदिरा गांधी यांच्या हत्येची घटनाही दाखवलेली आहे. दमदार अभिनय, उत्तम संवाद, उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी सह अनेक मुद्दे ट्रेलरमध्ये निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी व्यवस्थित पद्धतीने हाताळले आहेत.
‘इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया’ या डायलॉगने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. हा डायलॉग ट्रेलरच्या शेवटच्या भागात आहे. या चित्रपटाची कथा कंगना यांनीच लिहिली असून दिग्दर्शनाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट येत्या ६ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.