Kangana Ranaut: रामराज्यात राहतोय हे आमचं भाग्य! शेख हसीना भारतात येताच कंगना रनौतचं विधान

Kangana Ranaut Post On sheikh Hasina: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला. सोमवारी ढाक्यामध्ये प्रचंड अशांतता निर्माण झाल्यानंतर त्या देश सोडून भारतात आल्या, त्यावर खासदार कंगना राणौत यांनी प्रतिक्रिया दिलीय.
Kangana Ranaut: रामराज्यात राहतोय हे आमचं भाग्य! शेख हसीना भारतात येताच कंगना रनौतचं विधान
Mp Kangana Ranaut
Published On

हिंसक आंदोलनानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोमवारी ढाका येथे मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन झाल्यानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा देत शेख हसीना ह्या देश सोडून भारतात आल्या. या प्रकरणावर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार कंगना राणौत यांनी प्रतिक्रिया दिलीय. इस्लामिक देशांमध्ये कोणीही सुरक्षित नाही आणि शेख हसीना यांनीही भारताला सुरक्षित मानले. आम्ही रामराज्यात राहतो हे आमचे भाग्य असल्याचं विधान कंगना रणौत यांनी केलंय.

शेख हसीना भारतात आल्यानंतर मंडीच्या खासदार कंगना रणौत यांनी एक बातमी शेअर केली. इंस्टाग्रामवर पोस्ट करताना त्यांनी विरोधकांना टोला मारला. , 'भारत हे शेजारील इस्लामिक देशांचे खरे जन्मस्थान आहे. बांगलादेशचे माननीय पंतप्रधान यांना भारतात सुरक्षित वाटतंय. याचा आम्हाला सन्मान आणि आनंद वाटतो, पण भारतात राहणारे लोक विचारत राहतात की हिंदु राष्ट्र का? रामराज्य का? बरं का हे उघड आहे!!!' अशी पोस्ट त्यांनी केलीय.

बॉलिवूडमधून राजकारणात येणाऱ्या खासदार कंगना रणौत अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. शेख हसीना या भारतात आल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. 'मुस्लिम देशांमध्ये कोणीही सुरक्षित नाही, अगदी मुस्लिमही नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रिटनमध्ये जे घडत आहे ते दुर्दैवी आहे. आम्ही रामराज्यात राहतो, आम्ही भाग्यवान आहोत. जय श्री राम.'

गेल्या दोन दिवसांपासून बांगलादेशात हसीना सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने होत आहेत. यात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. बांगलादेशात वादग्रस्त कोटा प्रणालीच्या विरोधात तीव्र आंदोलने सुरू आहेत, याअंतर्गत १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्यांच्या कुटुंबांसाठी ३० टक्के नोकऱ्या आरक्षित आहेत. हे आरक्षण रद्द केलं जावं यासाठी बांगलादेशात आंदोलने केली आहेत. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबर रहमान यांची कन्या असलेल्या हसीना २००९ पासून येथे सत्तेवर आहेत. जानेवारीमध्ये झालेल्या १२ व्या सार्वत्रिक निवडणुकीत ते सलग चौथ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.

Kangana Ranaut: रामराज्यात राहतोय हे आमचं भाग्य! शेख हसीना भारतात येताच कंगना रनौतचं विधान
Explainer : शेख हसीनांचं पंतप्रधानपद गेलं, भारत-बांगलादेश संबंधावर काय परिणाम होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com