Sheikh Hasina:
Who is Sheikh HasinaMoney Control

Explainer : शेख हसीनांचं पंतप्रधानपद गेलं, भारत-बांगलादेश संबंधावर काय परिणाम होणार?

India Bangladesh Relations Impact : पाच वेळाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा (Sheikh Hasina resigns) द्यावा लागला. बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो, असे विश्लेषक सांगतात.
Published on

Bangladesh Crisis Violence : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज राजीनामा (Sheikh Hasina resigns) दिला. आरक्षणामुळे १५ वर्षांचे त्यांचं वर्चस्व संपले आहे. लष्कराने आज देशाची सुत्रे हातात घेतली आहेत. बांगलादेशमध्ये आज सरकारची सुत्रे आता लष्कराकडे आहेत. बांगलादेशमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता (Bangladesh Crisis) आहे, त्याचा फटका भारतालाही बसू शकतो, असे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक सांगत आहेत. शैलेंद्र देवळाणकर यांनी साम टिव्हीसोबत बोलताना बांगलादेशमधील परिस्थितीचा भारतावर कसा परिणाम होऊ शकतो? याबाबत सविस्तर माहिती दिली. भारतासाठी पुढचा काळ हा अतिशय आव्हानात्मक असेल, असेही त्यांनी नमूद केलेय. मागील १५ वर्षांमध्ये भारताचे आणि बांगलादेश यांचे संबंध चांगले होते, हे सांगायलाही विसरले नाहीत. पाहूयात ते नेमकं काय म्हणाले

भारतावर काय परिणाम होणार, काय सांगतात तज्ञ -

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार कोसळणं आणि तिथे ज्या पद्धतीची अस्थिरता निर्माण झाली. बांगलादेशच्या आर्थिक विकासासाठी आणि लोकशाहीच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे. त्याशिवाय हे भारतासाठीही अतिशय दुर्दैवी आणि नकारात्मक आहे. यामुळे बांगलादेशच्या आर्थिक विकासालाही खिळ बसणार आहे. बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा जर खालिदा झिया यांचं सरकार आलं तर भारतासाठी नकारात्मक असेल. कारण, मागील १५ वर्षे शेख हसीना पंतप्रधान असताना भारताचे बांगलादेशसोबतचे संबंध अतिशय स्थिर आणि प्रगतिपथावर होते. संरक्षण क्षेत्रातील संबंधही वाढले होते. मात्र आता भविष्यात तशी परिस्थिती राहणार नाही. कारण, भारतासाठीही हे एक आव्हान असेल. भारताला सीमेवर सुरक्षा वाढवावी लागेल. कारण, आशा अस्थिर परिस्थितीमध्ये निर्वासितांचे लोंढे, भारत-आणि बांगालदेशची चार हजार किमीची सीमा पार करुन आपल्याकडे येऊ शकतात. त्यामुळे भारतासाठी पुढचा काळ हा अतिशय आव्हानात्मक असेल, असं म्हणावे लागले. त्यामुळे बांगलादेशमधील अस्थिरता भारताच्या अंतर्गत सुरक्षेला प्रभावी ठरणारी आहे, असेच आपल्याला म्हणावे लागेल, असे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितले.

Sheikh Hasina:
Sheikh Hasina: आरक्षणामुळे शेख हसीनांच्या १५ वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग, बांगलादेशमध्ये नेमकं घडलं काय?

शेख हसीना भारतात, चार दिवस दिल्लीमध्ये मुक्काम -

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला . आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झालाय. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. लोक रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांनी पंतप्रधानांच्या घरावरही कब्जा केलाय. लोकांचा वाढता रोष पाहून शेख हसीना यांनी पंतप्रधानपद सोडून देशातून पलायन केले. आज त्या भारतामध्ये पोहचल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेख हसीना पुढील चार ते पाच दिवस नवी दिल्ली येथे राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com