Sheikh Hasina: आरक्षणामुळे शेख हसीनांच्या १५ वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग, बांगलादेशमध्ये नेमकं घडलं काय?

Bangladesh Protests : बांगलादेशमध्ये सत्तांतर, शेख हसीनांच्या १५ वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग, सरकारची सूत्रे लष्कराकडे, नेमकं घडलं काय?
Sheikh Hasina resigns
Sheikh Hasina resignsPTI
Published On

Bangladesh Crisis Violence: पाच वेळा बांगालदेशच्या पंतप्रधान राहिलेल्या शेख हसीना यांनी आज राजीनामा दिला. १५ वर्षे सत्तेत असणाऱ्या शेख हसीना यांना अचानक का देश सोडावा लागला? बांगलादेशमध्ये (Bangladesh) नेमकं काय सुरु आहे? देश का धुमसतोय, हिंसाचार का वाढलाय? शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा (Sheikh Hasina resigns) तर दिलाच, त्यांना देशही सोडावा लागला. प्रसारमाध्यामांच्या वृत्तानुसार, त्या सध्या भारतात आल्या आहेत. दुसरीकडे लष्कराने देशाची सूत्रे हातात घेतली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला अन् पंतप्रधानांना पायउतार व्हावं लागलं.

लष्कर प्रमुख यांनी आम्ही अंतरिम सरकार आम्ही स्थापन करू असा दावा केला आहे. आम्ही राष्ट्रपतींकडे जाऊ आणि देशात सरकार स्थापन करू. देश चालवणे गरजेचं आहे, आमच्यावर देशातील जनतेने विश्वास ठेवावा कुठलाही हिंसाचार करू नका, असे आवाहन त्यांनी केलेय. पण बांगलादेशमध्ये असं नेमकं काय झालं? की पाच वेळच्या पंतप्रधानांना देश सोडून जावा लागला.

Sheikh Hasina resigns
Bangladesh Crisis: शेख हसीनांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशात काय होणार? सैन्य देश चालवणार, काय म्हणाले लष्करप्रमुख?

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला आहे. आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झालाय. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. लोक रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांनी पंतप्रधानांच्या घरावर कब्जा केलाय. लोकांचा वाढता रोष पाहून शेख हसीना यांनी देश सोडला, त्या भारतात आश्रयाला आल्याचं समजतेय.

Sheikh Hasina resigns
Bangladesh Clashes: शेख हसीनांचा राजीनामा, बांगलादेश सोडून भारतात; बॉर्डरवर BSF अलर्ट

Bangladesh Violence: बांगलादेशमध्ये नेमकं काय झालं ?

सरकारी नोकऱ्यांमधील कोटा प्रणाली संपवण्यासाठी बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून विरोध प्रदर्शन सुरु आहे. पण रविवारी याला हिंसक वळण मिळाले. देशातील इंटरनेट, व्हाट्सअॅफ ठप्प करण्यात आले. या हिंसाचारात आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. एकाच पोलीस स्टेशनमधील १३ पोलिसांना आंदोलनकर्त्यांनी मारले. देशभरात शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज शेख हसीना यांनी पंतप्रधानपदावरुन पायउतार होत देश सोडला. आता लष्काराने देशाची सुत्रे हातात घेतली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बांगलादेशमध्ये या आधी अनेकदा हिंसाचार भडकला होता. सरकारी नोकऱ्यामध्ये कोटा पद्धतीने दिले जाणारे आरक्षण रद्द करा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत होते. १९७१ स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के राखीव असलेली कोटा पद्धत रद्द करण्यात यावी, त्यासाठी बांगलादेशमध्ये आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते. सुरुवातीला आंदोलनकर्त्यांनी आक्रमक रुप घेतल्यानंतर कोर्टानं कोटा पद्धतीमध्ये घट केली. पण लोकांचा रोष थांबला नाही, हिंसाचार वाढला. लोकांनी आंदोलन करत शेख हसीना यांचा राजीनाम्याची मागणी केली.

आंदोलनकर्त्यांनी सरकारी निवासस्थान, पोलीस स्टेशन, नेत्यांच्या घरी आंदोलन करत तोडफोड केली. त्यामुळे हजारो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यामुळे लोकांचा रोष आणखी वाढला. त्यानंतर आता त्यांनी राजीनामा दिला अन् भारतात दाखल झाल्या.

Sheikh Hasina resigns
Bangladesh Violence: बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार! १४ पोलिस कर्मचाऱ्यांसह ९० जण ठार, भारतीयांना तिकडे न जाण्याचा सल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com