Kalam 376 Announcement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kalam 376 Announced: ‘जो चुकला त्याला ठोकला’; महिला अत्याचाराचा वेध घेणाऱ्या ‘कलम ३७६’चे पोस्टर रिलीज

Kalam 376 Poster Released: अत्याचाराच्या प्रश्नाचा वेध घेणाऱ्या ‘कलम ३७६’या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे.

Chetan Bodke

Kalam 376 Announcement

देशामध्ये पुरुषांबरोबर महिलांनीही बहुतेक क्षेत्रात प्रगती केली आहे. अनेक स्त्रिया महत्वाच्या हुद्द्यावर पोहोचल्या आहेत. महिला आज पुरुषांच्या खांद्याला खादा लावून काम करताना दिसत आहेत. पण तरीही देशामध्ये स्त्रियांवरील ‘अत्याचार’ हा मोठा सामाजिक प्रश्न आहे. अशातच सोशल मीडियावर महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या प्रश्नाचा वेध घेणाऱ्या ‘कलम ३७६’या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सचिन धोत्रे दिग्दर्शित ‘कलम ३७६’ ची घोषणा करताना निर्मात्यांनी ‘ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला’ अशी धडाकेबाज टॅगलाईन देत चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचे निर्मिते आशिष धोत्रे आणि समीर गोंजारी असून सचिन धोत्रे आणि रवींद्र माठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन, तर एम. बी.अल्लीकट्टी यांनी छायांकन केलं आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे. (Marathi Film)

फाईलवर ठेवलेलं पिस्तुल आणि मागे भिंतीवर सावरकरांचा फोटो, महाराष्ट्र पोलिसची पाटी दिसते. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. आतापर्यंत अनेक चित्रपटांतून स्त्रियांते प्रश्न हाताळण्यात आले आहेत. मात्र स्त्रियांचं लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार कायद्याच्या दृष्टिकोनातून, हार्डहिटिंग पद्धतीनं, कोर्टरूम ड्रामा पद्धतीनं मांडल्याची उदाहरणं मराठीत अगदीच मोजकी आहेत. त्यामुळे ‘कलम ३७६’ हा चित्रपट कथानक कशा पद्धतीनं मांडणार याकडे लक्ष लागले आहे. (Films)

“लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. गेल्या चार दशकामध्ये इतर गुन्ह्यांच्या तुलनेत बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक वाढले असून गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आपण मागे पडत आहोत. दोन वर्षांच्या मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत बलात्काराच्या बळी ठरत आहेत. अशा स्थितीत कोणतीही कठोर कारवाई करण्याऐवजी आपल्या चुका लपवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणारे नेहमीच नवनवीन सबबी शोधत असतात. वृत्तमाध्यमांतून महिलांवरील बलात्कार आणि विनयभंगाच्या बातम्या रोज दाखवल्या जातात, पण ते रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची कुठेही चर्चा होत नाही.” चित्रपटाबद्दल दिग्दर्शक संतोष धोत्रे यांनी सांगितले.

“असे अत्याचार कधी थांबणार? आपण फक्त मूक प्रेक्षक बनून आपली पाळी येण्याची वाट पाहणार आहोत का? मुलींवर अत्याचार पूर्वीही होत होते आणि आजही होत आहेत. ते थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर...? आजही आपल्या समाजात अत्याचार करणारे खुलेआम फिरतात आणि निष्पाप पीडित मुलीकडे वाईट आणि अपमानास्पद नजरेने पाहिले जाते. समाज किंवा सरकार आपली जबाबदारी नीट पार पाडत नाही. अशा परिस्थितीत मुलीला सुरक्षित वाटेल, ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. याच मुद्द्यांचा वेध चित्रपटात घेतला जाणार आहे.” अशी प्रतिक्रिया चित्रपटाबद्दल दिग्दर्शक संतोष धोत्रे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

SCROLL FOR NEXT