kala Ghoda Festival 2025 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kala Ghoda Festival 2025: काला घोडा महोत्सवास सुरुवात; चित्रनगरीतर्फे कलाप्रेमींसाठी खास भेट...

Kala Ghoda Festival 2025: मुंबई नगरीची सांस्कृतिक ओळख असलेल्या सुप्रसिद्ध काला घोडा महोत्सवास सुरुवात झाली असून यावर्षी चित्रनगरीतर्फे कलाप्रेमींसाठी खास भेट भेट असणार आहे.

Shruti Vilas Kadam

Kala Ghoda Festival 2025: मुंबई नगरीची सांस्कृतिक ओळख असलेल्या सुप्रसिद्ध काला घोडा महोत्सवास सुरुवात झाली असून यावर्षीहीकलाप्रेमींची गर्दी या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. पण यावर्षी विशेष म्हणजे यंदा दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा साकारण्यात येणार आहे. सिने निर्मितीसाठी लागणाऱ्या तांत्रिक टाकाऊ साहित्यातून हा घोडा साकारण्यात येणार आहे.

काला घोडा महोत्सवात येणाऱ्या चोखंदळ आणि हौशी प्रेक्षकांसाठी नेहमीच विविध कलाकृती सादर केल्या जातात. यावर्षी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली प्रत्येक कलाकाराच्या कलेचा गौरव करणाऱ्या लंबी रेस का घोडा या संकल्पनेवर आधारित सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा तयार केला जात आहे.

कलाकारांनी कलाकारांसाठी तयार केलेला हा घोडा म्हणजे प्रत्येक कलाकाराला दिलेली मानवंदना असणार आहे. या शिल्पाच्या निर्मितीसाठी लागणारे सर्व साहित्य हे तांत्रिक टाकाऊ वस्तुतून आणि पर्यावरण पूरक साहित्याच्या वापरातूनच करण्यात येणार असून डॉ. सुमित पाटील यांनी या शिल्पाचे कला दिग्दर्शन केले आहे.

शाश्वत सिनेनिर्मिती या संकल्पनेवर या कलाकृतींच्या माध्यमातून भर देण्यात आला असल्याचे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्यलेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांनी सांगितले. मुंबईत काला घोडा महोत्सवास सुरुवात झाली असून हा महोत्सव २ फेब्रुवारी पर्यंत कलाप्रेमींना अनुभवता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Aircraft : सरकारी हवाई वाहनांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात येणार? आमदार महेश लांडगे यांचं महापालिका आयुक्तांना पत्र

बनावट इंस्टाग्राम अकाऊंटचा पर्दाफाश; मैत्रिणींचेच अश्लील फोटो केले व्हायरल, महिला वकिलाचा धक्कादायक कारनामा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी...

Hair Care : तुम्हाला ही सुंदर केस हवेत? मग केसांना लावा कडुलिंबाचे तेल, जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT