Tharla Tar Mag Actress Jyoti Chandekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

Tharla Tar Mag Actress Jyoti Chandekar: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या ६८व्या वर्षी पुण्यात निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती.

Shruti Vilas Kadam

Tharla Tar Mag Actress Jyoti Chandekar: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या ६८व्या वर्षी पुण्यात निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. १६ ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर १७ ऑगस्ट रोजी सकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.

ज्योती चांदेकर यांनी चार दशकांहून अधिक काळ रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतल्या पूर्णा आजी या त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी मनापासून प्रेम दिलं होतं. त्याशिवाय मी सिंधुताई सपकाळ, गुरु, ढोलकी, श्यामची आई यांसारख्या चित्रपटांमधून त्यांचा दमदार अभिनय रसिकांना पाहायला मिळाला.

त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील सहकलाकारांनी सोशल मीडियावरून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सोहम बांदेकर, जुई गडकरी, प्राजक्ता दीघे, मोनिका डबाडे, दिशा डानडे, अमित भानुशाली इत्यादींनी भावनिक शब्दांत आपल्या आठवणी व्यक्त केल्या.

अभिनेता सोहम बांदेकरने भावनिक पोस्टद्वारे लिहिले, “तू आजी नसून एक मैत्रीणच होतीस…” 'ठरलं तर मग' मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने ज्योती चांदेकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करताना, "हे स्वीकार होऊ शकत नाही. तू फसवलंस आजी," असं म्हटलं आहे. तर, मालिकेतील अर्जुन म्हणजेच अमित भानुशालीने भावुक पोस्ट लिहिली आहे. अमितने फोटो शेअर करुन ज्योती चांदेकर यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्यात. "खूप आठवण येईल. तू माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हतीस, तर एक शिक्षिका, एक गुरु होतीस ज्यांनी मला फक्त अभिनय किंवा परफॉर्मन्स नाही तर जीवनावर प्रेम करायला शिकवलं. तुझं आयुष्य जगण्याचं बिनधास्त आणि आनंदी तत्त्वज्ञान नेहमी माझ्यासाठी प्रेरणा राहील.

ज्योती चांदेकर या अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत्या. अंत्यसंस्कारावेळी तेजस्विनी भावनिक झाली होती. अनेक कलाकार आणि राजकीय व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबियांचे त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होत्या. तसेच मालिकेत कालच्या भागात त्यांची आठवणींनी भरलेली व्हिडिओ क्लिप दाखवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT