Devara Part 1 Trailer Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Devara Part 1 Trailer: ज्युनिअर एनटीआरचा भयानक अवतार, सैफ अली खानची खास झलक; 'देवरा'चा ट्रेलर पाहिलात का?

Devara Part 1 Movie: ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपट 'देवरा'चा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Priya More

साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'देवरा पार्ट- 1' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची एकएक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरची (Devara Part 1 Trailer) ते वाट पाहत होते. अखेर आज त्यांची प्रतीक्षा संपली. या ट्रेरलच्या माध्यमातून चाहत्यांना या चित्रपटाची झलक पाहायला मिळाली. ज्युनियर एनटीआरची दमदार स्टाईल ट्रेलरमध्ये दिसत आहे. तर जान्हवी कपूरसोबतची त्याची केमिस्ट्रीही खूपच जबरदस्त दिसत आहे. यासोबत या ट्रेलरमध्ये सैफ अली खानची देखील खास झलक पाहायला मिळत आहे.

'देवरा भाग-1' या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात जबरदस्त या संवादाने सुरू होतो. यामध्ये असे म्हटले जात आहे की 'प्राचीन काळात नरकासुर नावाचा राक्षस राहत होता. तो लोकांना खूप त्रास देत होता.' ज्युनियर एनटीआरचा या ट्रेलरमध्ये खूपच खतरनाक अवतार पाहायला मिळत आहे. सैफ अली खान देखील ट्रेलरमध्ये दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर 'देवरा पार्ट-1' या चित्रपटामधून साऊथ चित्रपटांमध्ये एन्ट्री करत आहे. त्यामुळे तिचे चाहते या चित्रपटाची खूपच आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून याआधी चित्रपटातील 'धीरे धीरे' आणि 'दावुडी' ही दोन गाणीही रिलीज झाली आहेत. या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ही गाणी सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

'देवरा पार्ट 1' हा एक तेलुगु ॲक्शन ड्रामा आहे. हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. कोरटाला शिवा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखनही केले आहे. या चित्रपटाची निर्मिती युवासुधा आर्ट्स आणि एनटीआर यांनी केली आहे. या चित्रपटाचे बजेट 300 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. तर सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत आहे. यांच्याव्यतिरिक्त प्रकाश राज, मिका श्रीकांत, शाइन टॉम चाको आणि चैत्रा रॉय हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT