Diljit Dosanjh concert
Diljit Dosanjhcanva

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची तिकीटं अवघ्या २ मिनिटांत संपली, कुठे होणार शो अन् तिकीट किती?

Diljit Dosanjh concert : पंजाबच्या दिलजीत दोसांझच्या शो ची तिकीट विक्री मंगळवारी दुपारी बारा वाजता होणार होती. या तिकिटांची किंमत १५०० रुपयांपासून असणार होती. चाहते बऱ्याच दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होते. जाणून घ्या काय घडलं तिकिट विक्री सुरू झाल्यावर …
Published on

diljit dosanjh dil luminati tour tickets: पंजाबचा प्रसिद्ध गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ याने चाहत्यांसाठी एका कॉन्सर्ट टूरची घोषणा केली होती. याची चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलीच रंगली. या कॉन्सर्टचं नाव दिल-लुमिनाटी (Dil-Luminati)असं आहे. याची एक सहल असणार आहे. दिलजीत दोसांझ त्याच्या कॉन्सर्ट टूर निमित्ताने सगळ्या देशांचे दौरे करत असतो. त्याचा मिडल इस्टचा दौरा नुकताच पूर्ण झाला. आता तो भारत दौरा करणार आहे अशा बातम्यांची चर्चाही मीडियात चालली.

दिलजीत दोसांझच्या चाहत्यांमध्ये तिकिट विक्री दरम्यान चांगलीच चढाओढ झाली. दिल-लुमिनाटी टूर च्या तिकिटांची विक्री Zomato Live वर ऑनलाइन पद्धतीने होणार होती. दिलजीत दोसांझच्या कॉनसर्टच्या तिकिटांची विक्री नेहमीच झपाट्याने होत असते. Zomato Live वर याच्या तिकिटांची विक्री मंगळवारी दुपारी बारा वाजता झाली आणि चाहत्यांनी अवघ्या दोन मिनिटांत ती संपवली केली.

Diljit Dosanjh concert
Dunki Drop 6 Banda: किंग खानच्या 'डंकी'मधील 'बंदा' गाणं रिलीज, दिलजीत दोसांझच्या आवाजातील गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

दिल-लुमिनाटी कॉनसर्टची ही प्री-सेल तिकिट विक्री होती. ही तिकीट फक्त एच डी एफ सी पिक्सल क्रेडिट कार्ड (HDFC Pixel credit card)धारकांसाठी होती. याचा कालावधी ४८ तासांचा आहे. याच बरोबर तिकिटांची विक्री क्षणात होण्याचं एक कारण म्हणजे एच डी एफ सी धारकांसाठी तिकिटांवर १० टक्क्यांची सवलत देण्यात येणार होती याचा पुरेपूर फायदा दिलजीत दोसांझच्या चाहत्यांनी घेतला.

Diljit Dosanjh concert
Jogi Teaser: दिलजीत दोसांझचा 'जोगी' चित्रपटाचा टीझर रिलीज; सप्टेंबरमध्ये OTT वर प्रदर्शित होणार

दिल-लुमिनाटी कॉनसर्टची तिकिटं १२ वाजता सगळ्यात कमी किमतीत होती. हे सिलव्हर भागात बसण्याचे तिकीट होते. तसेच गोल्डन भागातल्या तिकिटांची किंमत ३९९९ रुपये होती. या ,सवलतीवर चाहत्यांच लक्ष होतं. अखेर १२ वाजता त्यांनी दोन मिनिटात तिकीटं खरेदी केली. हा टूर शो पहील्यांदा दिल्लीत २६ ऑक्टोबर ला असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com