मुंबई : अन्न पुरवणारी कंपनी झोमॅटोच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी झोमॅटोच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे हा शेअर २६२ रुपयांपर्यंत पोहोचला. या शेअरविषयी बातमी लिहिताना हा शेअर ५ टक्क्यांनी वधारून २५५ रुपयांनी व्यवहारात होता. झोमॅटोने शेअर्सने मागील एक वर्षांत १६० टक्क्यांहून अधिक जास्त रिटर्न दिले आहेत.
गुरुवारी झोमॅटोच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. हा शेअर्स २०८ रुपयांनी वधारून ३०४ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यानंतर झोमॅटोचा शेअर्समध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, क्विक कॉमर्स बिझनेस ब्लिंकिटवर या शेअर्सविषयी सकारात्मक मत मांडल्यानंतर या शेअर्सच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे.
या आठवड्यात झोमॅटोने त्यांचं लक्ष्य ३५० रुपयांनी वधारून ३५३ रुपये केले होते. भारतीय बाजारात कंपनीला पसंती मिळू लागली आहे. जेपी मॉर्गन यांनी आर्थिक वर्षात २५-२८ वर्षांत या शेअर्समध्ये १५ ते ४१ टक्के वधारणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
झोमॅटोने शेअर किंमत लक्ष्य ३४० रुपये प्रति शेअर केला आहे. मॉर्गन यांनी २०८ रुपये प्रति शेअर लक्ष्य दिलं होतं. मागील सत्रातील तुलनेत ४० टक्क्यांनी अधिक आहे. दलालांनी सांगितलं की, 'रिटेल कंज्यूमरला सुविधा दिल्या जात आहे. यामुळे कंज्यूमरमध्ये तेजी दिसत आहे. यामुळे क्विक कॉर्मर्स कंपन्यांमधील ब्लिकंइटकडून लोक रिटेल वस्तू खरेदी करण्यास पसंती दर्शवत आहेत. याचा झोमॅटोवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
झोमॅटोचा शेअर्स चांगला परफॉर्मेन्स करत आहे. मागील १ वर्षांत या कंपनीच्या स्टॉकने १५९.५२ टक्क्यांनी रिटर्न दिले आहेत. तर मागील ६ महिन्यात या शेअर्सने ५३.६६ टक्क्यांनी रिटर्न दिले आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईटच्या अनुसार, झोमॅटोचं मार्केट कॅपिटलायजेशन २,२५,४९७.४३ कोटी रुपये आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.