Jolly LLB 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jolly LLB 3: कोर्टात दोन जॉली देणार कॉमेडीचा ट्रिपल डोस; अक्षय कुमार आणि अर्शद वारसी येणार आमने-सामने

Jolly LLB 3 Teaser: अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी ३' चा मजेदार टीझर १२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Shruti Vilas Kadam

जॉली एलएलबी ३ चा टीझर प्रदर्शित

कोर्टरूममध्ये दोन जॉली आमने-सामने

अक्षय-अर्शदचा चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार

Jolly LLB 3 Teaser: येत्या काळात बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटात दिसणार आहे. या कोर्टरूम ड्रामामध्ये त्याच्यासोबत अभिनेता अर्शद वारसी देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'जॉली एलएलबी ३' बद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा नवीनतम टीझर प्रदर्शित केला आहे. तो पाहिल्यानंतर, 'जॉली एलएलबी ३'यावेळी जॉली काय करणार आहे. असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

'जॉली एलएलबी ३' चा टीझर प्रदर्शित झाला

जॉली एलएलबी फ्रँचायझी २०१३ मध्ये दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केला. पहिल्या भागात अर्शद वारसी आणि दुसऱ्या भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसला होता. पण आता निर्मात्यांनी तिसऱ्या भागात म्हणजेच 'जॉली एलएलबी ३' मध्ये या दोन्ही कलाकारांना एकत्र आणले आहे.

जॉली एलएलबी ३ चा टीझर मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे, ज्याची घोषणा सोमवारीच करण्यात आली. चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे की यावेळी जॉली ऑफ कानपूर आणि जॉली ऑफ मेरठ कोर्टरूममध्ये एकमेकांसमोर येणार आहेत. जे या चित्रपटाचा उत्साह वाढवण्यासाठी पुरेसे आहे.

अक्षय आणि अर्शद व्यतिरिक्त अभिनेता सौरभ शुक्ला देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. गेल्या दोन भागात सौरभ शुक्ला यांनी न्यायाधीश सर सुंदर लाल त्रिपाठीच्या भूमिकेत आपल्या कॉमिक टायमिंगने सर्वांचे मन जिंकले आहे.

जॉली एलएलबी ३ कधी प्रदर्शित होणार

जॉली एलएलबी ३ चा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा हा विनोदी चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी या फ्रँचायझीचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत जे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागाकडूनही अशाच अपेक्षा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत पुण्यातील या ५ किल्ल्यांवर नक्की फिरून या

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; बडा नेत्यानं हाती घेतलं धनुष्यबाण, सतेज पाटलांना शिंदेंचा धोबीपछाड

Crime News: औरंगाबादमध्ये हत्याकांड! तरुणाला पकडून हातपाय बांधले, नंतर टोळक्यांनी क्रूरपणे संपवलं, भलतंच कारण समोर आलं

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Horoscope Saturday: व्यवसायात होणार भरभराट, ५ राशींसाठी सुखाचा दिवस; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT