Dashavatara: बाप-मुलाच्या धमाल नात्याची झलक 'आवशीचो घो'मध्ये; 'दशावतार'मधील पहिलं गाणं प्रदर्शित

Dashavatara Marathi Movie: ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट लवकरच म्हणजेच १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील पहिलं गाणं 'आवशीचो घो' नुकतंच प्रदर्शित झालं आहे.
Dashavatara Marathi Movie
Dashavatara Marathi MovieSaam Tv
Published On

Dashavatara Marathi Movie: प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट लवकरच म्हणजेच १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या भव्य चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांचा अप्रतिम अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

पोस्टर आणि टीझरने प्रेक्षकांमध्ये आधीच प्रचंड उत्सुकता निर्माण केली असतानाच, आता या चित्रपटातील पहिलं गाणं ‘आवशीचो घो’ नुकतंच प्रदर्शित झालं असून या आगळ्यावेगळ्या गाण्याने कोकणच्या मातीचा गंध सोबत आणला आहे. अनेकांना शिवी वाटणारा हा शब्द खरंतर लाडाने वापरला जाणारा शब्द आहे. मालवणी भाषेत आईला प्रेमाने आवशी आणि नवऱ्याला घो असं म्हणतात. म्हणूनच आईच्या नवऱ्याला म्हणजेच वडीलांना प्रेमाने ‘आवशीचो घो’ म्हणायची पद्धत आहे. दशावतार चित्रपटातलं हे गाणं सुद्धा बाप आणि मुलाच्या अनोख्या नात्याबद्दल आहे.

Dashavatara Marathi Movie
Coolie Advance Booking Collection: रजनीकांत यांच्या 'कुली'चा बोलबाला; पहिल्या दिवशी करणार इतक्या कोटींच कलेक्शन

दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं, वडील आणि मुलामधील नात्याचं एक अजब रसायन दाखवणारं आहे. हे गाणं वर वर पाहता मिश्किल किंवा गंमतीशीर वाटत असलं तरी ते गाणं बाप - मुलाच्या नात्याचं सारच मांडतं. विशेष म्हणजे यात कधी कधी मुलगा वडिलांची जबाबदारी घेणारा ‘वडील’ बनतो आणि वडील त्याचे ‘मूल‘ होतात. बाप मुलाच्या नात्याचं हळूवारपण उलगडणारं हे गाणं गुरु ठाकूरच्या समृद्ध लेखणीतून उतरलं असून, संगीत दिग्दर्शक ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर ओंकारस्वरुप याने ते गायलं आहे.

Dashavatara Marathi Movie
Baaghi 4: 'हर आशिक एक विलेन है'; टायगर श्रॉफ आणि संजय दत्त येणार आमने-सामने, टिझर बघून चाहत्यांचा आली 'अ‍ॅनिमल' ची आठवण

या गीताबद्दल गीतकार गुरु ठाकूर म्हणतात की, ‘’बाप आणि मुलगा यांच्यातील मैत्रीचं नातं मिश्किल आणि खट्याळ अंदाजात सादर करणारं गाणं आजवर कधीच झालं नव्हतं. ‘आवशीचो घो’ या गाण्यामुळे ते लिहिण्याची संधी मला मिळाली. मालवणी बोलीतील शब्दांचा गोडवा, ए. व्ही. यांच्या संगीताची जादू आणि पडद्यावर दिलीपजी आणि सिद्धार्थ यांचा अफलातून परफॉर्मन्स यांनी या गाण्याला वेगळं परिमाण दिलं आहे.’’

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, 'आवशीचो घो’ हे गाणं वडील-मुलामधील नात्याची वीण अत्यंत लोभसपणे अधोरेखित करतं. हे गाणं प्रत्येकाला आपल्या वडिलांच्या जवळ नेणारं, आणि हसताहसताही प्रत्येकाच्या मनाला भिडणारं असं हे गाणं आहे. वडील मुलाच्या नात्यातील प्रेम, ताण, समज-गैरसमज आणि काळानुसार बदलणारी जबाबदारी हे सगळं या एका गाण्यातून सहजतेने दाखवणं हे मोठं आव्हान होतं. परंतु गुरु ठाकूर, ए व्ही प्रफुल्लचंद्र आणि गायक ओंकार स्वरूप या सगळ्या टीमने ते उत्तमरित्या पार पाडलं. पडद्यावरही ते नातं सिद्धार्थ मेनन आणि दिलीप प्रभावळकर यांच्या केमिस्ट्रीतून कमाल उतरलंय!''

'दशावतार'चा टीझर पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आता ‘आवशीचो घो’ गाण्याने या चित्रपटातील भावनिक बाजूही उलगडायला सुरुवात झाली आहे. धमाल आणि हृदयस्पर्शी भावनांचं हे सुंदर मिश्रण प्रेक्षकांना नक्की भावेल, अशी आशा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com